सरकारने दुधासाठी कॉर्पोरेट कंपनी स्थापावी- राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 12:46 AM2018-08-01T00:46:00+5:302018-08-01T00:46:13+5:30

केंद्र सरकारच्या मालकीच्या आॅईल कंपन्यांच्या धर्तीवर राज्य सरकारने दुधाची कॉर्पोरेट कंपनी स्थापन करायला हवी. त्या माध्यमातून राज्याचा दूध ब्रँड विकसित करायला हवा.

Government should set up corporate company for milk: Raju Shetty | सरकारने दुधासाठी कॉर्पोरेट कंपनी स्थापावी- राजू शेट्टी

सरकारने दुधासाठी कॉर्पोरेट कंपनी स्थापावी- राजू शेट्टी

Next

पुणे : केंद्र सरकारच्या मालकीच्या आॅईल कंपन्यांच्या धर्तीवर राज्य सरकारने दुधाची कॉर्पोरेट कंपनी स्थापन करायला हवी. त्या माध्यमातून राज्याचा दूध ब्रँड विकसित करायला हवा. त्यामुळे उत्पादकांना न्याय देता येईल, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांना दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान मिळावे ही आमची अट मान्य झाली आहे. त्याची अंमलबजावणी १ आॅगस्टपासून होत आहे. जाहीर केलेला दर देण्यास टाळाटाळ झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल. यापूर्वी महानंदच्या माध्यमातून एक ब्रँड करण्याचा प्रयत्न झाला होता. महानंद राजकारण्यांच्या हातात सापडल्याने, या प्रयोगाचे वाटोळे झाले. मात्र, पुन्हा असा प्रयोग करण्यास हरकत नाही. दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्याकडे तशी मागणी केली आहे. त्यात ५१ टक्के हिस्सा राज्याचा आणि उर्वरीत खासगी गुंतवणुकीतून उभारावा. महानंद आणि आरेची यंत्रणा संबंधित कंपनीकडे हस्तांतरीत करावी. त्यामुळे राज्याचा चांगला ब्रँड होईल. परिणामी आपणच गुजरातमध्ये दूध विकू शकू, असे शेट्टी म्हणाले. पाच वर्षांत नाबार्डच्या माध्यमातून गोदामे, शीतगृहे, पॉलिहाऊसला अनुदान दिले गेले नाही. त्यामुळे शेतमाल साठविण्याचे काम ठप्प पडले आहे. केंद्र सरकार आॅनलाईनचा पुरस्कार करीत आहे. त्यासाठी शीतकरण, ड्रायर हाऊस, प्रतवारी करण्याची सुविधा निर्माण करीत नाही. अशा पायाभूत सुविधाच न दिल्यास शेतमालाला भाव कसा मिळेल, असा प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित केला.

हमीभावाचे खासगी विधेयक मांडणार
शेतकºयांना कर्जमुक्ती, हमीभाव मिळविण्याचा अधिकार आहे. त्यासाठी उत्पादनखर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा आणि न देणाºयावर १० ते १५ वर्षांच्या शिक्षेची तरतूद करावी अशा मागणीसाठी संसदेत खासगी विधेयक मांडणार असून, त्याला २२ पक्षांनी पाठिंबा दिल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

Web Title: Government should set up corporate company for milk: Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.