३७० कलमानंतर आरक्षणही रद्द करण्याचा सरकारचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 09:28 PM2019-08-29T21:28:38+5:302019-08-30T16:27:41+5:30
पुण्यात वडार समाजाच्या वतीने सत्ता संपादन मेळाव्याचे आयोजन केले होते़. मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ .
पुणे : आरएसएस हे आरक्षणवादी नाही़. ज्याप्रमाणे जम्मू काश्मीरमध्ये मुक्ती मोहम्मदसाहेबांचा वापर करुन नंतर ३७० कलम रद्द केले़,त्याप्रमाणे महाराष्ट्र, हरियाणा, झारखंडच्या निवडणुका संपल्यानंतर संपूर्ण सत्ता त्यांच्या ताब्यात येणार आहे़,त्यामुळे ते आरक्षण संपविल्याशिवाय राहणार नाही़, आरक्षित वर्गाने सावध होणे हीच वेळ आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे अॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले़. पुण्यात वडार समाजाच्या वतीने सत्ता संपादन मेळाव्याचे आयोजन केले होते़. मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ .
अॅड़ आंबेडकर यांनी सांगितले की, भाजपाने वंचित समाजाला केवळ आश्वासने दिली़. मात्र त्यांना सत्ता दिली नाही़ तर आरक्षण संदर्भात मोहन भागवत यांनी आरक्षणावर समीक्षा झाली पाहिजे, असे म्हटले आहे़. त्यामुळे ते आरक्षण संपविल्याशिवाय राहणार नाहीत़. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टी म्हणून अस्तित्व कमी होऊ लागले आहे़. त्यामुळे ज्यांना जिंकून येणार नाही असे वाटते ते जिंकणारा पक्ष म्हणून भाजपमध्ये जात आहे़. ज्यांनी भ्रष्टाचार केला ते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवाले भाजपमध्ये जात आहे़. त्यामुळे भाजप चोरांचा पक्ष होतोय का असा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले़ .
२ जी घोटाळा झाला तेव्हा बीजेपी, आरएसएस, अण्णा हजारे पुढे आले़ मात्र, त्यांना सोडल्यावर अण्णा झोपले होते आणि भाजपने पुरावा दिला नसल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला़.
आघाडी संदर्भात आम्ही काँग्रेसला ऑफर दिली आहे़. . आमची उद्या आणि परवा बैठक आहे़. त्यात निर्णय होईल़ वेळ कमी असून आम्ही कोणासाठी थांबणार नाही़. आम्ही पुढे आगेकुच करणाऱ आमच्याच पक्षातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना आम्ही उमेदवारी देणार आहोत़ बाहेरच्या उमेदवारांना आम्ही उमेदवारी देणार नसल्याचे आंबेडकर यांनी सांगितले़.
मेळाव्यात बोलताना ते म्हणाले, आपली सत्तास्थाने धोक्यात आल्यावर ते सर्व भाजपमध्ये जात आहे़ मावळे गेले, आता राजेही जात आहे़. इतकी वर्षे त्यांनी सर्व निधी स्वत:साठी वापरला़,निधीची कमरतता नाही़. ती उपेक्षित समाजाला देण्याची नियत पाहिजे़ त्यासाठी आपण सत्तेत बसले पाहिजे़ इलेक्शन म्हणजे स्वत:ला विकण्याचा दिवस हे बंद झाले पाहिजे़ यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव नवनाथ पडळकर, अनिता जाधव, प्रभावती वाडकर, प्रियंका सोळंकी यांची भाषणे झाली़ महासचिव अनिल जाधव यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते़ या मेळाव्यात अनेकांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला़ .