ओबीसी कोट्यातूनमराठा आरक्षणासाठी सरकारचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:32 AM2020-12-04T04:32:59+5:302020-12-04T04:32:59+5:30
--- वाल्हे : महाराष्ट्रात मराठा आरक्षण हा विषय सध्या ऐरणीवर आहे. मराठा समाज याबाबत अतिशय अग्रेशिव आणि कोणत्याही परिस्थितीत ...
---
वाल्हे : महाराष्ट्रात मराठा आरक्षण हा विषय सध्या ऐरणीवर आहे. मराठा समाज याबाबत अतिशय अग्रेशिव आणि कोणत्याही परिस्थितीत "ओबीसी" कोट्यातून आरक्षण मिळवण्यासाठी अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने तयारी चालू केली आहे. महाविकास आघाडीत बहुसंख्य मंत्री हे मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे सरकारी नोकरशाही नकळतपणे त्यांना मदत करीत आहेत. त्यासाठी सर्वच "ओबीसी" बाराबलुतेदार, भटके, विमुक्तांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे समता परिषदेचे राज्याचे कार्याध्यक्ष बापुसाहेब भुजबळ यांनी सांगितले. सासवड ( ता. पुरंदर ) येथे सासवड नगरपालिके पासुन पुरंदर तालुका समता परिषद आणि सहयोगी संघटनानी तहसील कार्यालयापर्यंत ''''''''ओबीसी आरक्षण बचाव" पायी मोर्च्याचे आयोजन केले होते. तहसीलकचेरी याठिकाणी सभा होऊन तहसीलदार यांना विविध संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल लडकत, जिल्हा महिला अध्यक्ष ज्योती झुरंगे पुरंदर तालुका अध्यक्ष चंद्रकांत गिरमे, महिला अध्यक्ष नीलम होले, पं. स. माजी उपसभापती निलेश जगताप, बहुजन हक्क परिषदेचे सुनील धिवार, महाराष्ट्र परीट सेवा मंडळ रमेश पवार, नाभिक संघटना भरत मोरे,राजन गायकवाड जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्याचे प्रवक्ते गंगाराम जाधव, अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे श्रीकांत राणे, माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र वढणे,राजेंद्र गायकवाड, माऊली वचकल,आदींनी आपले विचार व्यक्त केले.
छत्रपती, फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचारावर चाललेल्या.या महाराष्ट्रात जर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार असेल तर राज्यभर ओबीसीच्या वतीने आंदोलने छेडले जातील असे जिल्हाध्यक्ष अनिल लडकत यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक सचिन भोंगळे, सुहास लांडगे, विजय वढणे, नगरसेविका मंगला म्हेत्रे, सीमा भोंगळे, सारिका हिवरकर, समता परिषदेचे माजी तालुकाध्यक्ष आबा भोंगळे, सारिका वढणे, जय मल्हार क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष साहेबराव जाधव, लिना वढणे, शशिकांत शेवते, नंदकुमार दिवसे, विनय गुरव, नाना लांडगे, सखाराम लांडगे, सुधाकर गिरमे, मुन्ना शिंदे, आण्णा भोंगळे,रोहिदास कुदळे, बाजीराव इनामके,सूर्यकांत भुजबळ,कुंडलिक पवार,विलास कुंभार,संतोष भुजबळ,संतोष गायकवाड,दादासाहेब मदने,शंकर भुजबळ उपस्थित होते.
समता परिषदेचे पुरंदर तालुका अध्यक्ष चंद्रकांत गिरमे मोर्चाचे आयोजन केले. सुत्रसंचालन किशोर वचकल यांनी केले. तर राजेंद्र ताम्हाणे यांनी आभार मानले.
--
फोटो : ०३ वाल्हे आंदोलन
फटो ओळी : ओबीसी आरक्षण बचाव यासाठी सासवड येथे आपल्या मागणीसाठी ओबीसी समाज पायी मोर्चाने जात असताना.