‘महा एनजीओ फेडरेशन’ला राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:10 AM2021-01-14T04:10:28+5:302021-01-14T04:10:28+5:30

पुणे : पत्रकार दिनाच्या निमित्ताने राजभवन मुंबईतील कार्यक्रमात पुण्यातील महा एनजीओ फेडरेशनला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोरोना काळात ...

Governor awards ‘Maha NGO Federation’ | ‘महा एनजीओ फेडरेशन’ला राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार

‘महा एनजीओ फेडरेशन’ला राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार

Next

पुणे : पत्रकार दिनाच्या निमित्ताने राजभवन मुंबईतील कार्यक्रमात पुण्यातील महा एनजीओ फेडरेशनला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोरोना काळात २० जिल्ह्यात ३ लाख लोकांसाठी केलेल्या सेवेबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते फेडरेशनचे शेखर मुंदडा, शशांक ओंबासे यांनी पुरस्कार स्विकारला.

कोरोनाशी लढताना ज्या पत्रकारांचा मृत्यू झाला, त्या पत्रकारांच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व महा एनजीओ फेडरेशनच्यावतीने या कार्यक्रमात घेण्यात आले आहे.

शेखर मुंदडा म्हणाले की, महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने कोरोना काळात मोठ्या प्रमाणात काम करण्यात आले. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या ९६ संस्थाना ५ लाखांची मदत करण्यात आली. त्यामध्ये ३० वृद्धाश्रम व २२ विशेष मुलांच्या शाळांचा देखील समावेश होता. सुमारे १५ हजार सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी २० जिल्हयांमध्ये मदतकार्य केले. तसेच तब्बल ७५ हजार अन्नाची पाकीटे, २० हजार शिधा संच, १५ हजार कुटुंबांना आयुर्वेदिक काढा, २० हजार मास्क, ५ हजार फेस शिल्ड, ६५० पीपीई कीट देण्यात आले.

पुणे, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आदीवासी भागांमध्ये ही मदत देण्यात आली. महा एनजीओ फेडरेनने राज्यभरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले त्यात ६०० रक्तदात्यांनी सहभाग घेतला. पुण्यातील पीएमपीएमएलच्या चालकांना ५०० हेल्मेट फेस शिल्ड देण्यात आले. यांसह अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते.

Web Title: Governor awards ‘Maha NGO Federation’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.