राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतला पुणे विभागाचा कोरोना उपाययोजना आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 08:41 PM2020-04-06T20:41:50+5:302020-04-06T20:56:30+5:30

डॉक्टर्स, नर्सेस,पोलिस, सफाई कर्मचारी यांचा उत्साह वाढवण्याची गरज आहे. त्यांना अधिक प्रोत्साहित करावे..

Governor Bhagat Singh Koshari reviews Pune region's of Corona solution | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतला पुणे विभागाचा कोरोना उपाययोजना आढावा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतला पुणे विभागाचा कोरोना उपाययोजना आढावा

Next
ठळक मुद्देकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत भविष्यात बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता गृहित धरुन उपाययोजना

पुणे : कोरोनाविरुध्दच्या लढयात राज्यातील प्रशासकीय यंत्रणा खूप चांगले काम करीत असून , प्रशासकीय यंत्रणेबरोबरच अन्य स्वयंसेवी संस्थांनाही सहभागी करुन घ्यावे असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले. विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी राज्यपालांनी राजभवन मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी केलेल्या उपाययोजना, मदत कार्य यांचा यावेळी त्यांनी आढावा घेत मार्गदर्शन केले.
    राज्यपाल म्हणाले, कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासन, पोलिसदल, आरोग्य विभाग, एनजीओ तसेच अनेक सामाजिक संस्था हिरीरीने काम करत आहेत. राज्यातील ज्येष्ठ नागरिक, कामगार, मजूर यांच्यापर्यंत मदतकार्य पोहचवण्याबरोबरच बेघर, बेरोजगारांच्या समस्यांचाही जलद निपटारा करावा. या सर्व घटकांना अन्न, निवारा, याबरोबरच औषधोपचार अशा सुविधा वेळेवर पोहचवाव्यात. सफाई कर्मचाऱ्यांची या परिस्थितीत मोठी भूमिका आहे. डॉक्टर्स, नर्सेस,पोलिस, सफाई कर्मचारी यांचा उत्साह वाढवण्याची गरज आहे. त्यांना अधिक प्रोत्साहित करावे, अशा सूचनाही यावेळी राज्यपालांनी दिल्या.
    पुणे विभागात कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिली. सद्यस्थितीची माहिती देताना डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात आज अखेर एकूण 2450 बाधितांचे नमुने घेतले. यापैकी 149 जण पॉझिटिव्ह व 2146 जण निगेटिव्ह आढळले आहेत. यापैकी 26 जण बरे होवून घरी गेले आहेत. मृत्यूंची संख्या 6 इतकी आहे. आजअखेर विभागातील एकूण 2444 संशयित व्यक्तींना रुग्णालयात दाखल केले होते. त्यापैकी 2150 व्यक्तींना सोडले असून 292 व्यक्ती अद्याप रुग्णालयात उपचार घेत आहेत. विभागातील दाखल झालेल्या 85 हजार 340 प्रवाशांपैकी 36 हजार 070 प्रवाशांचा फॉलोअप पूर्ण झाला असून अजून 49 हजार 270 प्रवासी शिल्लक आहेत.
 दिल्ली मरकजवरुन परत आलेल्या व्यक्तींबद्दल माहिती देताना डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात सध्या एकूण 661 व्यक्ती असून त्यापैकी 299 व्यक्तींना क्वारंटाईन केले आहे. 49 व्यक्ती या महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात असून 205 व्यक्ती महाराष्ट्राबाहेर अन्य राज्यांमध्ये आहेत. अजून 107 व्यक्तींचा शोध सुरु आहे. विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये 9 स्वयंसेवी संस्था, एनजीओ कार्यरत असून रिलीफ कॅम्प मधील व्यक्तींना 330 एनजीओ जेवणाची व्यवस्था पुरवित आहेत. लष्कराच्या सदर्न कमांडच्या सुविधा राखून ठेवण्यात आल्या आहेत. जैविक कचऱ्याच्या योग्य निर्मूलनासाठी उपाययोजना केल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. 
    यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यातील कोरोना बाबतची सद्यस्थिती व उपाययोजनांची राज्यपालांना विस्तृत माहिती दिली. ते म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. भविष्यात बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता गृहित धरुन उपाययोजना केल्या जात आहेत. आयसोलेशन व आयसीयू व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात येत आहे. डॉक्टर्स व स्टाफची पुरेशी संख्या असून त्यांना आवश्यक सुविधा, साहित्य पुरविण्यात येत आहे. सर्वसामान्यांना लॉकडाऊनमुळे त्रास होवू नये, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील कामगारांच्या कॅम्पमध्ये असलेल्या कामगार, मजूर वगार्ला जेवण देण्यासाठी कामगार विभागाने व्यवस्था केली आहे. कामगारांचे स्थलांतर न होण्याबाबत दक्षता घेतली जात आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी कामगारांच्या जेवणाची व्यवस्था केली असून 145 एनजीओ मार्फत 1 लाख 15 हजार व्यक्तींना जेवण उपलब्ध करुन देण्यात आले आहे. शिधापत्रिका नसलेल्यांसाठी सामाजिक संस्था, एनजीओ तर्फे भोजन व्यवस्था केली आहे. कोणतीही व्यक्ती उपाशी राहणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांना दूध, भाजीपाला अन्नधान्य यांचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

Web Title: Governor Bhagat Singh Koshari reviews Pune region's of Corona solution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.