राज्यपाल कोश्यारी यांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:15 AM2021-08-17T04:15:47+5:302021-08-17T04:15:47+5:30
लाखेवाडी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व इस्मा नवी दिल्लीच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता ...
लाखेवाडी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व इस्मा नवी दिल्लीच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील यांनी रविवारी पुणे येथे भेट घेतली. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन देऊन विविध विषयांवर चर्चा केली.
या भेटीप्रसंगी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती देणे, अकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सुनिश्चित धोरण ठरवून योग्य पद्धतीने प्रवेश देणे, इंजिनियरिंग व मेडिकल प्रवेश संदर्भातील पूर्वपरीक्षांचे वेळापत्रक सुनिश्चित करून परीक्षा घेणेबाबत तसेच संपूर्ण महाराष्ट्रसह पुणे ग्रामीण व विशेष करून इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे सक्तीने केली जाणारी वीजतोडणी थांबवण्याबाबत राज्यपाल महोदय यांना अंकिता पाटील यांनी विनंती केली. सध्या शासनाकडून शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीजजोड तोडणी मोहीम सुरु आहे. शेतकरी हे अजूनही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. सध्या शेतकऱ्यांकडे पैसे उपलब्ध होतील असे कोणतेही पीक शेतात नसल्याने शेतकरी हा लगेच वीजबिलाचे पैसे भरू शकत नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीजतोडणी मोहीम त्वरित थांबवावी, अशी मागणी या भेटीत केली.
सध्या पावसाने ओढ दिल्याने पिके कोमेजून चालली आहेत. विहिरी व विंधनविहिरींच्या उपलब्ध पाण्यावर पिके जगण्याची धडपड शेतकरी करीत असताना, वीज खंडित मोहीम सुरू करून शासनाने शेतकऱ्यांना अडचणीत टाकले आहे. मात्र लोकप्रतिनिधी हे वीज खंडित मोहिमेबद्दल गप्प आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वीजपुरवठा तत्काळ पूर्ववत सुरू करणेबाबत आपण लक्ष घालावे, अशी विनंती भेटीत अंकिता पाटील यांनी राज्यपालांना केली. या सर्व विषयांत लक्ष घालू असे राज्यपालांनी नमूद केले. या वेळी अंकिता पाटील यांनी राज्यपालांना अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची अंकिता पाटील यांनी पुणे येथे भेट घेतली.
१६०८२०२१-बारामती-०३