राज्यपाल पुणे दौऱ्यात आता सिंहगड पायी करणार सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:15 AM2021-08-13T04:15:08+5:302021-08-13T04:15:08+5:30
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते ...
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते रविवारी (दि. १५) स्वातंत्र्यदिनी सकाळी ९.०५ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजवंदन सोहळा होणार आहे. ही माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली असून, त्यानंतर दुसऱ्या दिवशी १६ ऑगस्टला राज्यपाल किल्ले सिंहगडावर जाणार असल्याचे कळवण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सिंहगडाला भेट देणार आहे. यापूर्वी आपल्या पुणे दौऱ्यादरम्यान ते गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांनी वयाच्या ७९ व्या वर्षी शिवनेरी पायी सर केला होता. अशा प्रकारे पायी शिवनेरी किल्ला सर करणारे ते पहिलेच राज्यपाल ठरले आहेत. तो चर्चेचा विषय झाला होता. आता ते सिंहगडावर पायी जाणार आहेत. राज्यपालांची अंगकाठी अतिशय काटक असल्याने आणि ते दररोज नियमित सकाळी चालतात. त्यामुळे त्यांची तब्येत ठणठणीत आहे. यापूर्वी ते शिवनेरीवर पायी गेले असताना त्यांनी सांगितले, की मी डोंगर चढलेला माणूस आहे. त्यामुळे गड सर करणे माझ्यासाठी कठीण काम नाही.