राज्यात दुष्काळी भागात पावसाची कृपा; कोकण, विदर्भ, मुंबई भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 11:19 AM2024-07-02T11:19:50+5:302024-07-02T11:21:54+5:30

ज्या भागात दुष्काळी परिस्थिती असते, त्याच ठिकाणी सर्वाधिक पाऊस झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. येत्या महिन्यात चांगला पाऊस होईल, असा अंदाज आहे....

Grace of rain in drought prone areas of the state; Konkan, Vidarbha, Mumbai regions recorded below average rainfall | राज्यात दुष्काळी भागात पावसाची कृपा; कोकण, विदर्भ, मुंबई भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद

राज्यात दुष्काळी भागात पावसाची कृपा; कोकण, विदर्भ, मुंबई भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद

पुणे : राज्यामध्ये कोकण, मराठवाडा या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून, विदर्भ, मुंबई भागामध्ये मात्र अद्याप पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ज्या भागात दुष्काळी परिस्थिती असते, त्याच ठिकाणी सर्वाधिक पाऊस झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. येत्या महिन्यात चांगला पाऊस होईल, असा अंदाज आहे.

यंदा मान्सून वेळेवर आला असला, तरी राज्यामध्ये काही भागांत अद्याप चांगल्या पावसाची प्रतीक्षाच आहे. हवामान विभागानुसार यंदा १०६ टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज दिला आहे. परंतु, यावेळी पावसाने दुष्काळी भागावर अधिक कृपा केल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून दिसून येते. सोलापूर, नगर, बीड, लातूर, धुळे, परभणी, जालना, जळगाव, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. हे सर्व जिल्हे दुष्काळी भागातील आहेत. यंदा कोकणातदेखील कमी पाऊस झाला आहे. त्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस होत असतो. जून महिन्यात पावसाचा खंड पडणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्रज्ञांनी व्यक्त केला होता, तो खरा ठरला. राज्यातील छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सरासरीहून ५० टक्के कमी पाऊस झाला आहे. आता या आठवड्यात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

१ जून ते ३० जून २०२४ पर्यंत पडलेला पाऊस

जिल्हा - सरासरी - झालेला पाऊस ---- टक्केवारी

पालघर - ३१७ - २५७ - उणे १९

ठाणे - ३५१ - २७०            - उणे २३

मुंबई शहर - ४५८ - २२८            - उणे ५०

मुंबई उपनगर - ४३५ - २०७            - उणे ५२

रायगड - ५०६ - ४१०            - उणे १९

रत्नागिरी - ६८२ - ६५१            - उणे ५

सिंधुदुर्ग - ७५४ - ६७२             - उणे ११

कोल्हापूर - २९४ - १८८             - उणे ३६

सांगली - १०८ - १४६            - ३५

सातारा - १५६ - १५७            - ००

पुणे            - १४९ - १६३ - १०

नगर - ९७ - १२२ - २५

नाशिक - १३४ - १२६ - उणे ६

सोलापूर - ९० - २०४ - १२५

धाराशिव - ४३२ - ३२१ - उणे २६

बीड - १०९ - १६० - ४७

लातूर - ११६ - २२६ - ९४

छ. संभाजीनगर - ४४५ - २६९ - उणे ४०

धुळे             - ९८ - ११७ - उणे १९

नंदुरबार - ११७ - ९०             - उणे २३

नांदेड - १२१ - १११ - उणे ०८

परभणी - ११५ - १६४ - ४२

जालना - १११ - १३६ - २२

जळगाव - ९७ - १२९            - ३३

हिंगोली - १४३ - २९             - उणे ७९

बुलढाणा - ११४ - १३८ - २१

यवतमाळ - १४२ - १३७ - उणे ३

वाशिम - १४३ - १६४ - १५

अकोला - १२१ - १२२             - १

अमरावती - १२५ - १००             - उणे २०

वर्धा - १३९ - ११९             - उणे १४

चंद्रपूर - १४४ - ७५             - उणे ४८

नागपूर - १३९ - ९०             - उणे ३५

गडचिरोली - १७३ - ९१             - उणे ४७

जून महिन्यात खूप कमी पाऊस झाला आहे. दुष्काळी भागात चांगला पाऊस झाला. विदर्भ, कोकण, मुंबईत पावसाची प्रतीक्षा आहे. सध्या बंगालच्या उपसागराकडून उत्तरेकडे वारे वाहत आहेत. त्यामुळे आताच्या हवामानात बदल हाेणार नाही. त्यामुळे आता तरी चांगल्या पावसाची शक्यता नाही. ४-५ जुलैनंतर हवामान बदलू शकते.

-डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ

Web Title: Grace of rain in drought prone areas of the state; Konkan, Vidarbha, Mumbai regions recorded below average rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.