पदवीधर निवडणूक स्थगिती फेटाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 04:26 AM2020-11-26T04:26:59+5:302020-11-26T04:26:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद मतदार संघाच्या निवडणुका पुढे ढकलाव्या किंवा या निवडणुकांना स्थगिती द्यावी, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद मतदार संघाच्या निवडणुका पुढे ढकलाव्या किंवा या निवडणुकांना स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
न्यायाधीश आर. डी. धनुका आणि न्यायाधीश माधव जे. जामदार यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.
ही याचिका लक्ष्मण चव्हाण यांनी ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत दाखल केली होती. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकांमध्ये मतदार नोंदणी करण्यात निवडणूक आयोगाने कुचराई केली. ५ सप्टेंबर २०१६ रोजी निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार काढलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी केली नाही, आदी मुद्दे याचिकाकर्त्यांनी मांडले होते. मात्र एकदा सुरु झालेली निवडणूक प्रक्रिया थांबवण्याचे अधिकार कोणत्याच न्यायालयाला नसल्याने या याचिकेची दखल घेऊ नये, असा आक्षेप केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगातर्फे मांडण्यात आले. ते न्यायालयाने मान्य केले.