कृषी पदवीचे प्रवेश बारावीच्या गुणांवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 05:00 AM2017-12-29T05:00:45+5:302017-12-29T05:00:49+5:30
पुणे : प्रथम वर्ष कृषी पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी सामाईक प्रवेश चाचणी (सीईटी)चा निर्णय अजूनही चर्चेतच लटकला आहे. त्यामुळे यंदाही इयत्ता बारावीतील गुणांच्या आधारेच पदवीचे प्रवेश होतील, हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे.
राजानंद मोरे
पुणे : प्रथम वर्ष कृषी पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी सामाईक प्रवेश चाचणी (सीईटी)चा निर्णय अजूनही चर्चेतच लटकला आहे. त्यामुळे यंदाही इयत्ता बारावीतील गुणांच्या आधारेच पदवीचे प्रवेश होतील, हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे.
राज्य शासनाने यावर्षी कृषी पदवी अभ्यासक्रमाचा समावेश व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये केला आहे. तसेच मागील दोन वर्षांपासून प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील चार कृषी विद्यापीठांमधील सुमारे १५ हजार जागांवर प्रवेशासाठी ‘सीईटी’ घेण्याचा विचार राज्य कृषी परिषदेकडून केला जात आहे. विद्यापीठांशी एकूण १९२ महाविद्यालये संलग्न असून, त्यापैकी १५६ महाविद्यालये खासगी आहेत. अनुदानित महाविद्यालयांमधील प्रवेश क्षमता सुमारे २ हजार ७०० तर विनाअनुदानितमधील सुमारे १२ हजार एवढी आहे. दरवर्षी इयत्ता बारावीतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना बीएसस्सी कृषी, उद्यान, वन, कृषी जैवतंत्रज्ञान, गृहविज्ञान यांसह अन्य पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश दिले जातात.
>...तर विद्यार्थ्यांवर अन्याय
कोणतीही सीईटी घ्यायची असल्यास त्यासाठी सहा महिने वेळ देणे आवश्यक आहे. ‘कृषी’साठी सीईटीचा निर्णय दोन महिन्यांपूर्वीच होणे आवश्यक होते.
- हरीश बुटले, प्रवेश परीक्षा तज्ज्ञ