ग्रामपंचायती होणार ‘आॅनलाइन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 02:46 AM2017-12-10T02:46:08+5:302017-12-10T02:46:20+5:30
मुळशी तालुक्यामधील अतिदुर्गम असलेला मोसेखोरे हा भाग अद्याप ही अनेक मूलभूत व गरजू सुविधांपासून वंचित असताना आता या भागांमध्ये इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी बीएसएनएलकडून केबल टाकण्याचे काम नुकतेच सुरू करण्यात आल्याने मोसे खो-यातील मौजे तव व मोसे खुर्द या दोन गावांमधील ग्रामपंचायती आता पहिल्यांदाच आॅनलाइन होणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिरंगुट : मुळशी तालुक्यामधील अतिदुर्गम असलेला मोसेखोरे हा भाग अद्याप ही अनेक मूलभूत व गरजू सुविधांपासून वंचित असताना आता या भागांमध्ये इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी बीएसएनएलकडून केबल टाकण्याचे काम नुकतेच सुरू करण्यात आल्याने मोसे खो-यातील मौजे तव व मोसे खुर्द या दोन गावांमधील ग्रामपंचायती आता पहिल्यांदाच आॅनलाइन होणार आहेत.
वरसगाव धरणाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या या अतिदुर्गम भागाच्या खोºयामध्ये अनेक भौगोलिक समस्यांमुळे इंटरनेटची केबल टाकता येणार नसल्याचे कारण पुढे करीत आॅनलाइन सुविधेमधून मौजे तव व मोसे खोरे ही गावे वगळण्यात आली होती. परंतु ह्या गावांना आॅनलाइन सुविधा मिळवून देण्यासाठी तवच्या सरपंच पल्लवी लालासो पासलकर, लालासाहेब पासलकर व रवींद्र पासलकर यांनी बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाºयांशी संपर्क साधून त्याच्याशी पत्रव्यवहार केला. माऊली मरगळे, दिलीप पासलकर, लालू ठिकडे, महादू मरगळे, बबन पासलकर, ज्ञानेश्वर ठिगळे, शशिकांत पासलकर व विठ्ठल पासलकर या सर्वांचे नेहमीच सहकार्य लाभले. यानंतर याठिकाणी तातडीने काम सुरू करण्यात आलेले आहे.
आता पानशेत ते तव या रस्त्याचे नुकतेच भूमिपूजन हे काही दिवसांपूर्वीच झालेले आहे. त्यामुळे आता मोसे खोºयातील गावे पुणे व कोकणाला जोडली जाणार आहेत. त्यामुळे या भागांचा संपर्क वाढणार असून येथील नागरिकांच्या विकासाला चालना मिळणार आहे.
मूलभूत सुविधाही नाहीत
मुळशी तालुक्यामध्ये असलेला मोसे खोरे हा भाग देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास सत्तर वषार्पेक्षा जास्त कालावधी झाला असताना सुद्धा अद्याप ही अनेक मूलभूत सुविधा पासून वंचित आहे.
या बाबतचे वृत्त हे ‘लोकमत’ने वारंवार दिलेले होते. त्यातच या भागामध्ये आता नुकतीच कुठे वीज मिळालेली आहे. तर काही महिन्यांपूर्वी स्वातंत्र्या नंतर प्रथमच ग्रामसचिवालय मिळालेले आहे तर काही गावांमध्ये आताशी कुठे कच्चे रस्ते मिळालेले आहेत. तर या भागामध्ये दळणवळणाची खूपच मोठीच समस्या असल्याने या भागाचा जगाशी खूपच कमी प्रमाणात संपर्क आहे यावरून या भागाचे वास्तव्य समोर येत.