पुणे जिल्ह्यात ओबीसी आरक्षणाशिवायच ग्रामपंचायत पोटनिवडणुका; ५ जूनला मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 06:10 PM2022-05-04T18:10:27+5:302022-05-04T18:12:46+5:30

जाणून घ्या कसा असेल निवडणूक कार्यक्रम...

gram panchayat by election in pune district without obc reservation voting on june 5 | पुणे जिल्ह्यात ओबीसी आरक्षणाशिवायच ग्रामपंचायत पोटनिवडणुका; ५ जूनला मतदान

पुणे जिल्ह्यात ओबीसी आरक्षणाशिवायच ग्रामपंचायत पोटनिवडणुका; ५ जूनला मतदान

Next

पुणे : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील निधन, राजीनामा अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या २४३ पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ५ जून रोजी मतदान, तर ६ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

राज्य शासनाने ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास स्थगिती दिली आहे; परंतु ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका अनेक दिवसांपासून रिक्त असल्याने राज्य निवडणूक आयोगाने शासनाची परवानगी घेऊन पोटनिवडणुकीचाकार्यक्रम जाहीर केला.

कसा असेल निवडणूक कार्यक्रम-

तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस 5 मे 2022 (गुरुवार) प्रसिद्ध करावी, 13 ते 20 मे उमेदवारी अर्ज एकूण दाखल करणे, 23 मे रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करणे, उमेदवारी अर्ज मागे घेणे 25 मे पर्यंत, निवडणूक चिन्हांचे वाटप करणे, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे. 5 जून रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 मतदान करणे. मतमोजणी जून 6 रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत 9 जून 2022 पर्यंत निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.

जिल्ह्यात 222 ग्रामपंचायतीमधील 243 रिक्त जागेची पोटनिवडणूक होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिली आहे.

Web Title: gram panchayat by election in pune district without obc reservation voting on june 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.