Gram Panchayat Election: आंबेगावमधील १८ पैकी १४ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 06:56 PM2022-09-19T18:56:37+5:302022-09-19T19:04:32+5:30

भाजपाकडे राजेवाडी ग्रामपंचायत असल्याचा दावा संबंधित पक्षांनी केला आहे...

gram panchayat election 2022 result NCP dominates 14 out of 18 Gram Panchayats in Ambegaon | Gram Panchayat Election: आंबेगावमधील १८ पैकी १४ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

Gram Panchayat Election: आंबेगावमधील १८ पैकी १४ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

googlenewsNext

घोडेगाव (पुणे) :आंबेगाव तालुक्यात झालेल्या १८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये १४ ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस, ३ शिंदे गट तर १ भाजपाच्या ताब्यात असल्याचा दावा संबंधित पक्षांनी केला आहे.

१८ पैकी १४ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामपंचायतींमध्ये आंबेगाव गावठाण, थोरांदळे, गंगापुर बुद्रुक, पिंपळगाव तर्फे घोडा, राजपूर, माळीण, शिनोली, आसाणे, कोंढवळ, ढाकाळे, पोखरी, जांभोरी, तिरपाड, फदालेवाडी / उगलेवाडी यांचा समावेश आहे तर शिवाजीराव आढळराव पाटील पुरस्कृत शिंदे गटाकडे वडगाव काशिंबेग, पंचाळे बुद्रूक, वाळुंजवाडी यांचा समावेश आहे तर भाजपाकडे राजेवाडी ग्रामपंचायत असल्याचा दावा संबंधित पक्षांनी केला आहे.

निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींचे नाव, निवडणूक आलेल्या सरपंचाचे नाव व सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे-

शिनोली : सरपंच मंगेश सखाराम पारधी, सदस्यपदी मीरा तुकाराम काळे, सुवर्णा अरुण सरोदे, संतोष बबन बो-हाडे, नीता गंगाराम काळे, केशव लक्ष्मण कडाळे, सुजाता लहू बोऱ्हाडे, रवींद्र बच्चू पवार, आशा गणेश सोमवंशी, शकुंतला सुदाम काळे, सुनील सोमा काळे, गणेश चंद्रकांत बोऱ्हाडे.

पिंपळगाव तर्फे घोडा : सरपंच सायली ज्ञानेश्वर लाडके, सदस्यपदी मनीषा संजय लोहकरे, दिलीप सावळेराम काळे, अश्विनी संतोष पोखरकर, निशा विष्णू बोऱ्हाडे, प्रसाद विठ्ठल जोशी, सायली ज्ञानेश्वर लाडके, अश्विनी प्रफुल्ल लाडके, लक्ष्मण पांडुरंग वागदरे, प्रवीण बाळासाहेब ढमढेरे.

पंचाळे बुद्रुक : सरपंच संगीता सुरेश किर्वे, सदस्यपदी समीर मच्छिंद्र गारे, पूजा राजू गोनटे, दीपाली राजेंद्र भालेराव, सविता तानाजी जढर, सुरेश नामदेव किर्वे, रामचंद्र दगडू तारडे तर एक जागा रिक्त राहिली.

राजपूर : सरपंच चंद्रकांत दगडू लोहकरे, सदस्यपदी प्रकाश राहू लोहकरे, कमल ज्ञानेश्वर लोहकरे, ठकुबाई रघुनाथ शेळके, गोरक्षनाथ भीमा वायाळ, प्रवीण लक्ष्मण उंडे, मोनिका गोटिराम लोहकरे तर एक जागा रिक्त

ढाकाळे : सरपंच धोंडिबा दारकू लांघी, सदस्यपदी अक्षय शांताराम जंगले, ज्योती सागर काळे, विजय विठ्ठल अंकुश, भारती ईश्वर डामसे, सविता जगन काळे, एकनाथ नंदाराम सुपे तर एक जागा रिक्त राहिली.

तिरपाड : सरपंच सोमा भीमा दाते, सदस्यपदी सारिका शंकर पारधी, देवकाबाई देवराम हिल, नामदेव गिरजू दाते, सीताराम देवजी गवारी, दीपक बाबू मेमाने, विमल रामचंद्र गवारी, शैला धोंडू आंबवणे, दत्तू सखाराम आंबवणे तर एक जागा रिक्त राहिली.

गंगापुर बुद्रुक : सरपंच मंगल चिंतामण केदारी, सदस्यपदी सारिका राजेंद्र केदारी, संतोष महादेव भवारी, शोभा गणेश लोहोट, कविता राहुल केदारी, कोमल धनंजय येवले, संदीप प्रभाकर येवले, निलम दत्तात्रय लोहोट, लक्ष्मण आबाजी कोंढावळे, बाळू दत्तात्रय आवटी.

पोखरी : सरपंच हनुमंत सोमाजी बॅढारी, सदस्यपदी दीपक बबन भागित, आदिनाथ चिंधू भेंडारी, पार्वता बाळू बेंढारी तर एकूण चार जागा रिक्त राहिल्या.

माळीण : सरपंच रघुनाथ दगडू झांजरे, सदस्यपदी नामदेव पुनाजी असवले, रेवुबाई चंद्रकांत असवले, प्रमिला मच्छिंद्र लेंभे, भामाबाई हरिश्चंद्र झांजरे, शिवाजी विठ्ठल लेंभे, हेमा नामदेव भालचिम, कविता चंद्रकांत मोहांडुळे.

कोंढवळ : सरपंच सविता काळू कोकाटे, सदस्यपदी लक्ष्मी दत्तात्रय लोहकरे, सुरेखा विनायक लोहरके, नितीन दुंदा लोहकरे, सविता रमेश दाते, इंदुबाई नामदेव कवटे, नामदेव पांडुरंग कोंढवळे, यशोदा बाळू कोंढवळे, शंकर दारकु केदारी, सागर ज्ञानेश्वर कोकाटे.

जांभोरी : सरपंच सुनंदा विठ्ठल पारधी सदस्यपदी मनीषा अंकुश केंगले, श्वेता किसन गिरमे, बबन किसन केंगले, नानुबाई चंद्रकांत साबळे, लता शांताराम केंगले, सुनील बबन पारधी, भोराबाई मारुती केंगले, शिवराम नामदेव केंगले, दुंदा लक्ष्मण कोकोटे.

उगलेवाडी/फदालेवाडी : सरपंच विनोद वसंत उगले, सदस्य विलास गेणभाव उगले, सुरेखा सुनील फदाले, उज्ज्वला बाळासाहेब तातळे, भरत मारुती फदाले, स्वाती लक्ष्मण भवारी, सचिन ज्ञानेश्वर उगले, मंगल सुभाष शिंगाडे.

आंबेगाव गावठाण : सरपंच प्रमिला गणेश घोलप, सदस्य युवराज बबन तारडे, अनिता सचिन विरणक, विजय गेणभाव घोलप, विनोद सुनील काठे, परविन राजू पानसरे, पूनम कुमार घोलप, मिलिंद रमशे भांगरे

वाळूजवाडी : सरपंच नवनाथ चिंतामण वाकुंज, सदस्य रक्मिणी पुनाजी खंडागळे, सुवर्णा संतोष चौगुले, कांताराम सोमा कडाळे, यशोदा मारुती वाळुंज, मयूर जिजाबा गायकवाड, संदीप सुदाम पवार, सोनाली सुनील वाळुंज.

वडगाव काशिंबेग : सरपंच सौरभ संभाजी पोखरकर, सदस्य सुजाता विजय भूते, आशा नामदेव वाळुंज, योगेश विजय पिंगळे, कल्पना राजू कडधेकर, सुप्रिया बाळासाहेब पिंगळे, गणेश लक्ष्मण खिरड, भाऊ दत्तात्रय डोके, रेश्मा संदीप दैने, सुजाता संजय वायकर.

थोरांदळे ग्रामपंचायत सर्व बिनविरोध झाली. यामध्ये सरपंचपदी जिजाभाऊ ज्ञानेश्वर टेमगिरे, सदस्यपदी संजय वसंत टेमगिरे, रोहिणी योगेश टेमगिरे, नितीन नारायण फुटाणे, चंद्रकला दत्तात्रय बारवकर, यमुना धनंजय टेमगिरे, संदीप विलास टेमगिरे, अलका मधुकर विश्वासराव, मनीषा संजय मिंढे, विक्रम विठ्ठल टेमगिरे निवड झाली.

राजेवाडी ग्रामपंचायत सर्व बिनविरोध झाली. यामध्ये सरपंचपदी शुभांगी नीलेश साबळे, सदस्यपदी दत्तात्रय यशवंत शिंदे, मंदा सुनील गभाले, सुनील सखाराम उंडे, गणेश काशिनाथ म्हसळे हे बिनविरोध तर तीन जागा रिक्त राहिल्या.

Web Title: gram panchayat election 2022 result NCP dominates 14 out of 18 Gram Panchayats in Ambegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.