मावळ तालुक्यात राजकारण्यांचे मनोमिलन; एक सरपंच बिनविरोध!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 12:44 PM2022-12-16T12:44:58+5:302022-12-16T12:45:44+5:30
आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लक्षात घेत या ग्रामपंचायत निकालावर सर्वांचे लक्ष...
- प्रसाद कुटे
कामशेत (पुणे) : राज्यातील सत्ता बदलाचे परिणाम तालुक्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांवर दिसत असून मावळ तालुक्यात शिरगाव ग्रामपंचायत वगळता इतर आठ ग्रामपंचायतमध्ये निवडणूक होत असल्याने गाव पातळीवर तालुक्यातील राजकीय हस्तक्षेप प्रकर्षाने जाणवत आहे. राजकीय अस्तित्व प्रतिष्ठा व आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लक्षात घेत या ग्रामपंचायत निकालावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
यामध्ये तालुक्यातील राजकारणाचा प्रभाव प्रभावीपणे पेलत व गावचे गावपण टिकविण्यात शिरगाव ग्रामपंचायत यशस्वी झाले असून येथील सर्व उमेदवार व सरपंचपदाचा उमेदवार बिनविरोध झाले आहेत तर तळेगाव शहरालगत असणाऱ्या इंदोरी गावाचे सर्व सदस्य बिनविरोध झाले आहेत.
इंदोरी ग्रामपंचायतीचे सर्व १७ सदस्य बिनविरोध
शिरगाव ग्रामपंचायत येथील सरपंचपदाचा उमेदवार व सर्व नऊ सदस्य बिनविरोध झाले असून सरपंचपद वगळता इंदोरी ग्रामपंचायतचे सर्व १७ सदस्य बिनविरोध झाले आहेत.
नऊपैकी आठ ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका
शिरगाव ग्रामपंचायत वगळता इतर सर्व ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यामध्ये सर्वांत जास्त जागा असणाऱ्या इंदोरीमध्ये सर्व सदस्य बिनविरोध झाले असून सरपंचपदासाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत.
गावनिहाय बिनविरोध सदस्य संख्या
गोडुंब्रे - एकूण सदस्य संख्या तीन
देवले - गाव एकूण सदस्य संख्या सहा
भोयरे - एकूण सदस्य संख्या एक
सावळे - एकूण सदस्य संख्या तीन
शिरगाव - एकूण सदस्य संख्या नऊ
वरसोली - एकूण सदस्य संख्या चार
कुणे ना.मा. - एकूण सदस्य संख्या एक
निगडे - एकूण सदस्य संख्या नऊ
इंदोरी - एकूण सदस्य संख्या १७
निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले एकूण उमेदवार संख्या
गाव लढत जागा उमेदवार (सरपंच) उमेदवार (सदस्य)
गोडुंब्रे ०४ ०४ ०८
देवले ०१ ०४ ०२
भोयरे ०६ ०३ १३
सावळे ०३ ०२ ०६
वरसोली ०५ ०२ १०
कुणे ना.मा. ०८ ०४ १९
निगडे ०९ ०२ १८
इंदोरी - ०३ -