शिरूर तालुक्यात ७१ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे घुमशान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:07 AM2020-12-23T04:07:46+5:302020-12-23T04:07:46+5:30

कान्हुरमेसाई : शिरूर तालुक्यात ७१ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे घुमशान सुरू झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर करताच या ...

Gram Panchayat elections in 71 villages in Shirur taluka | शिरूर तालुक्यात ७१ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे घुमशान

शिरूर तालुक्यात ७१ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे घुमशान

Next

कान्हुरमेसाई : शिरूर तालुक्यात ७१ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे घुमशान सुरू झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर करताच या गावांमध्ये गुलाबी थंडीतही राजकारण वातावरण गरम झाले आहे.

निवडणूक जाहीर होताच ग्रामीण भागातील वातावरण ढवळून निघाले आहे. ग्रामपंचायतची निवडणूक पुढील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी महत्त्वाची ठरणार आहे त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य सुद्धा या निवडणुकीत लक्ष घालत आहे प्रत्येक गावांमध्ये आपल्याच पॅनलचे वर्चस्व असावे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे ग्रामपंचायत सदस्य पदासाठी इच्छुक असलेले उमेदवारही मोर्चेबांधणी करत आहेत. मतदार नाराज होऊ नये याची काळजी घेतली जात आहे यापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोगाने निवडणूक स्थगिती केली होती आता त्या वेळी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या इच्छुकांनी नव्याने अर्ज दाखल करावे लागणार आहेत.

निवडणूक घोषित होताच गावी पारावर आणि चावडीवर बैठकांना ऊत आहे. निवडणुकीसाठी अत्यंत कमी कालावधी असलेल्या ने इच्छुक मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे तोपर्यंत मतदारांचा कानोसा घेतला जात आहे. गावोगावी या थंडीत बैठकी सुरू झाल्या आहेत मतदारांचा अंदाज घेऊन काही उमेदवारी दाखल करण्याच्या तयारीत आहेत. आपल्या विजयाची शक्यता गृहीत धरून अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत या निवडणुकीत युवक उमेदवारांमध्ये उत्साह संचारलेचे दिसून येत आहे. यामुळे गावे प्रस्तावित त्यांच्या राजकारणाला धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे मात्र उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरच या एकतर गावांमधील खरे चित्र स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत इच्छुक मतदारांना आपल्याकडे वळविण्यात प्रयत्नांची पराकाष्टा करणार आहेत मतदार मात्र सर्वच चुकांना तुर्तास आपल्या पाठीमागे फिरवित आहेत .

--

पारावर रंगतोच गप्पांचा फड

निमगाव दुडे, रावडेवाडी आमदाबाद, चांडोह, वडनेर खुर्द, नागरगाव, आंधळगाव, पिंपळसुटी, कुरळी, गणेगाव दुमाला, बाभुळसर बुद्रुक, सादलगाव, कोळगाव डोळस, निर्वी, चिंचणी, गुनाट, शिंदोडी, चिंचोली मोराची, वरुडे, निमगाव भोगी, दहिवडी, जातेगाव बुद्रुक, जातेगाव खुर्द, भांबर्डे, गणेगाव खालसा, बुरुंज वाडी, बाभुळसर खुर्द, मोटेवाडी, गोलेगाव, करंदी, आपटी, पिंपळे जगताप, डिंग्रजवाडी, खैरेनगर, खैरेवाडी, मिडगुलवाडी, पिंपळे खालसा, हिवरे आदी गावामध्ये सध्या केवळ ग्रामपंचायत निवडणुकीच्या गप्पा रंगताहेत. गावातील पारावर तरण्यापोरांपासून ते वयोवृध्दांपर्यंत सध्या निवडणुकीत कोणत्या गटाचं पारडं भारी आणि कोणत्या गटाला कोणाचा पाठिंबा मिळणार याची जोरदार चर्चा सुरु आहे.

--

२२कान्हूरमेसाई निवडणूक

Web Title: Gram Panchayat elections in 71 villages in Shirur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.