ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:10 AM2018-08-31T00:10:54+5:302018-08-31T00:11:17+5:30
दौंड तालुक्यातील ५ ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीची ही शेवटची सार्वत्रिक निवडणूक असल्याने कुल-थोरात समर्थकांनी वर्चस्व पणाला लावले
केडगाव : दौंड तालुक्यातील ५ ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीची ही शेवटची सार्वत्रिक निवडणूक असल्याने कुल-थोरात समर्थकांनी वर्चस्व पणाला लावले आहे. दौंड तालुक्यातील देलवडी, देऊळगावराजे, नाथाचीवाडी, वासुंदे, रोटी या ५ गावांची निवडणूक जाहीर झाली असून निवडणुकीच्या घोषणेनंतर गावपुढारी सरसावले आहेत. इच्छुकांची चाचपणी चालू झाली आहे.
आमदार राहुल कुल व जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात हे या निवडणुकीवर बारीक लक्ष ठेवून असून कार्यकर्त्यांना बळ देत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वीचा ट्वेंटी-ट्वेंटी सामना म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. निवडणूक श्रावण महिना व गणपती उत्सवामध्ये होणार असल्याने मांसाहारी मतदारराजाची मात्र पंचाईत झाल्याची चर्चा परिसरात आहे.
च्संबंधित गावांमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीसाठी ५ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर या काळात नामनिर्देशन अर्ज भरता येतील. च्अर्जांची छाननी १२ सप्टेंबर रोजी होईल. १५ रोजी माघार, उमेदवारांना चिन्हवाटप व उमेदवार यादी प्रसिद्ध केली जाईल. २६ सप्टेंबर रोजी मतदान, तर २७ सप्टेंबर रोजी निकाल घोषित केले जाणार आहेत.