जिल्ह्यात ग्रामपंचयात निवडणुकीत महिलांचाच बोलबाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:12 AM2021-01-22T04:12:12+5:302021-01-22T04:12:12+5:30
पुणे : जिल्ह्यात लागलेल्या ७४६ ग्रामपंचयातीच्या निवडणुकीत ८१ ग्रामपंचायती या बिनवरोध झाल्या होत्या. त्यानंतर ६४९ ग्रामपंचयातीच्या निवडणुका लागल्या. जवळपास ...
पुणे : जिल्ह्यात लागलेल्या ७४६ ग्रामपंचयातीच्या निवडणुकीत ८१ ग्रामपंचायती या बिनवरोध झाल्या होत्या. त्यानंतर ६४९ ग्रामपंचयातीच्या निवडणुका लागल्या. जवळपास ५ हजार ३३ जागांसाठी ११ हजार ७ उमेदवार रिंगणार उभे होते. यात ६० टक्याहून अधिक महिला या निवडूण आल्याने अनेक गावांवर महिला राज आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवल्याचा फायदा महिलांना मिळाला आहे.
जिल्ह्यात ग्रामपंचयात निवडणुकांची रणधुमाळी नुकतीच संपली आहे. जवळपास महिन्या भरापासून निवडणुकीची रंगत जिल्ह्यात रंगली होती. डिसेंबरपूर्वी मुदत संपलेल्या ७४६ ग्रामपंचयातीच्या निवडणुका जानेवारी महिन्यात घेण्यात आल्या. आरक्षण जाहिर झाल्यापासूनच अनेक इच्छूक निवडणुकीच्या तयारीला लागले होते. यात महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव झाल्या होत्या. मात्र, त्यापेक्षा जास्त महिला उमेदवार निवडणुक रिंगणात उभ्या राहिल्या होत्या. यातील ८१ ग्रामपंचयातीच्या निवडणुका या बिनविरोध झाल्या होत्या. त्यातही महिलांची संख्या लक्षणिय होती. १५ तारखेला झालेल्या निवडणुकीत जवळपास ५ हजार ३३ जागांसाठी जवळपास ११ हजार ७ उमेदवार उभे राहिले होते. या उमेदवारांना १४ लाख ५६ हजार ३५७ मतरांनी मते दिली. यातही ६० टक्याच्या जवळपास महिला उमेदवारांना मतदारांनी संधी देत त्यांना निवडूण दिल्याने अनेक गावांवर महिला राज आले आहे.