कारभारणींच्या हाती ग्रामपंचायती!

By admin | Published: March 31, 2015 12:33 AM2015-03-31T00:33:24+5:302015-03-31T00:33:24+5:30

जिल्ह्यातील २0१५ ते २0२0 या कालावधीत होणाऱ्या १४0५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत आज जाहीर झाली. पहिल्यांदाच ग्रामपंचायतीत महलांसाठी ५0

Gram Panchayat in the hands of the employees! | कारभारणींच्या हाती ग्रामपंचायती!

कारभारणींच्या हाती ग्रामपंचायती!

Next

पुणे : जिल्ह्यातील २0१५ ते २0२0 या कालावधीत होणाऱ्या १४0५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत आज जाहीर झाली. पहिल्यांदाच ग्रामपंचायतीत महलांसाठी ५0 टक्के जागा राखीव ठेवल्याने अनेकांचे राजकीय गणित बिघडले आहे. राजकीयदृष्ट्या अनेक मोठ्या व संवेदनशील ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे.
शासनाने तीन वर्षांपूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत.
शासनाच्या या निर्णयानंतर प्रथमच जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. जिल्ह्यात सुमारे १४०२ ग्रामपंचायती आहेत.
यापैकी काही ग्रामपंचायती आदिवासी विभागातील आहेत, तर १२९१ ग्रामपंचायतींच्या पुढील पाच वर्षांचे आरक्षणाचे प्रमाण ठरविण्यात आले आहे.
यामध्ये जिल्ह्यात
अनुसूचित जातीसाठी ६४ खुले
व ६४ महिला, अनुसूचित जमातीमध्ये ३३ खुले व ३३ महिला, इतर मागासवर्गीय १७४ खुले व
१७५ महिला आणि खुल्या प्रवर्गातून ३७४ पुरुष व
३७४ महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Gram Panchayat in the hands of the employees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.