मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:15 AM2021-09-04T04:15:08+5:302021-09-04T04:15:08+5:30
सरडेवाडीत पोषण अभियानाची कार्यशाळा शुक्रवारी (दि.३) पार पडली. यावेळी जानकर बोलत होते. १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत ...
सरडेवाडीत पोषण अभियानाची कार्यशाळा शुक्रवारी (दि.३) पार पडली. यावेळी जानकर बोलत होते. १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाने पोषण महाअभियान आयोजित केला आहे. त्या अभियानांतर्गत वडापुरी बीटची कार्यशाळा सरडेवाडी येथील गायकवाड-शिद वस्ती येथील अंगणवाडीत पार पडली. या कार्यशाळेचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्या प्रियंका शिद व ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सावित्रीमातेच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. यावेळी वडापुरी बीटमधील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या. या कार्यशाळेत पोषण अभियानाची सविस्तर माहिती अंगणवाडी पर्यवेक्षिका राणी जाधव यांनी दिली. यावेळी उपसरपंच हनुमंत जमदाडे, सतीश चित्राव, रवींद्र सरडे, गोकुळ कोकरे, विजय शिद, सचिन सरडे, प्रियंका शिद, सुप्रिया कोळेकर, वैशाली कोळेकर, वैशाली शिद, गयाबाई तोबरे, अलका कडाळे, दक्षता ढावरे, अलका ढावरे, छाया कदम, प्रियंका शिंदे, गंगुबाई सिताफ तसेच वडापुरी बीटमधील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.
०३बारामती सरडेवाडी
सरडेवाडी येथे एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाने पोषण महाअभियान कार्यशाळा पार पडली.