ग्रामपंचायतींची कोटी-कोटी उड्डाणो
By admin | Published: November 24, 2014 11:29 PM2014-11-24T23:29:11+5:302014-11-24T23:29:11+5:30
अनधिकृत बांधकामांबाबत ओरड होत असतानाच या बांधकामांमुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी कोटीच्या कोटी उड्डाणो घेतली आहेत.
Next
पुणो : अनधिकृत बांधकामांबाबत ओरड होत असतानाच या बांधकामांमुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी कोटीच्या कोटी उड्डाणो घेतली आहेत. जिल्ह्यातील 79 ग्रामपंचायतींचे वार्षिक उत्पन्न एक कोटीपेक्षा अधिक असून, या ग्रामपंचायतींच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत घरपट्टी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गेल्या चार-पाच वर्षात जिल्ह्यात प्रामुख्याने शहरालगतच्या गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात बांधकामे झाली आहेत. जिल्ह्यात होणारी ही बेसुमार वाढ व अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी जिल्हाधिका:यांनी सन 2क्1क्मध्ये सर्व ग्रामपंचायतींना बांधकामांच्या नोंदी घालण्यास बंदी घातली आहे. परंतु, ग्रामपंचायतींचे उत्पन्न बुडते या कारणाखाली जिल्ह्यात अनधिकृत बांधकामांच्या नोंदी घालण्याचे काम सुरूच आहे. यामुळेच जिल्ह्यातील प्रामुख्याने अनधिकृत बांधकामे मोठय़ा प्रमाणात होत असलेल्या ग्रामपंचायतींचे वार्षिक उत्पन्न कोटीच्या घरात गेले आहे.
जिल्ह्यात 1 हजार 4क्7 ग्रामपंचायती असून, यामध्ये 79 ग्रामपंचायतींचे वार्षिक उत्पन्न 1 कोटीपेक्षा अधिक आहे. तर 127 ग्रामपंचायतींचे 5क् ते 1 कोटी, 257 ग्रामपंचायतींचे 25 ते 5क् लाख, 753 ग्रामपंचायतींचे 5 ते 25 लाख आणि पाच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या केवळ 186 ग्रामपंचायती आहेत. (प्रतिनिधी)
4एक कोटीपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या सर्वाधिक 22 ग्रामपंचायती हवेली तालुक्यातील.
4शिरूर 11, खेड 11 आणि मावळ तालुक्यातील 1क् ग्रामपंचायतींचा समावेश आहेत.
4बारामती आणि वेल्हा तालुक्यात एकाही ग्रामपंचायतीचे एक कोटी पेक्षा अधिक उत्पन्न नाही.
एक कोटीपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायती
4फुरसुंगी, वाघोली, आंबेगाव बुद्रुक, न:हे, देहू, धायरी, कदमवाकवस्ती, केशवनगर, लोणी काळभोर,
लोणी कंद, लोहगाव, मांजरी बुद्रुक, खुर्द, नांदेड, उंड्री, पिसोळी, उरुळी कांचन, मंचर, नारायणगाव, वारुळवाडी, ओझर, ओतूर, चाकण, राजगुरुनगर, नाणोकरवाडी, तळेगाव ढमढेरे, कोरेगाव, रांजणगाव गणपती, भिगवण.