करवसुलीसाठी ग्रामपंचायतींनी वेगवेगळे उपक्रम राबवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:09 AM2021-03-25T04:09:55+5:302021-03-25T04:09:55+5:30
शेलपिंपळगाव : नियमित करवसुलीसाठी ग्रामपंचायतींनी वेगवेगळे उपक्रम राबविले पाहिजे. ज्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून एक आदर्शवत ग्रामपंचायतीची ...
शेलपिंपळगाव : नियमित करवसुलीसाठी ग्रामपंचायतींनी वेगवेगळे उपक्रम राबविले पाहिजे. ज्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून एक आदर्शवत ग्रामपंचायतीची निर्मिती होईल असा विश्वास आमदार दिलीप मोहिते - पाटील यांनी व्यक्त केला.
दौंडकरवाडी (ता. खेड) येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नागरिकांच्या सोयीसाठी राबविण्यात आलेल्या मोफत पीठगिरणी उपक्रमाचे तसेच व्यायाम शाळा व म्हांबरेवाडी - रामनगर जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे उद्घाटन आमदार दिलीप मोहिते - पाटील व जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी पंचायत समिती सदस्या वैशाली गव्हाणे, सरपंच शकुंतला लांडे, उपसरपंच सीताराम गुजर, युवानेते मयूर मोहिते, माजी सरपंच सतोष गव्हाणे, वामनराव लांडे, ग्रामपंचायत सदस्य गणेश लांडे, जयहिंद दौडकर, शरद कड, रुपाली म्हाबरे सुरेखा लांडे, पूजा गुजर, पुष्पा दौंडकर, आश्विनी गायकवाड, ग्रामसेवक सारिका गोरडे, जयश्री कामठे आदिंसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार मोहिते - पाटील म्हणाले की, दौंडकरवाडी ग्रामपंचायतीने सुरू केलेला उपक्रम अतिशय चांगला आहे. यामुळे ग्रामपंचायतची करवसुली शंभर टक्के होण्यास मदत होईल. परिणामी, शासनाच्या विविध योजनांमध्ये गाव पात्र राहण्यास मदत होईल. दरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे व पंचायत समितीच्या सदस्या वैशाली गव्हाणे आदींनी या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच वामन लांडे, तर मुख्याध्यापक संतोष मुंगसे यांनी आभार मानले.
२४ शेलपिंपळगाव मोहिते
दौंडकरवाडी (ता. खेड) येथे मोफत पीठगिरणी उपक्रमाचे उद्घाटन करताना दिलीप मोहिते पाटील, निर्मला पानसरे व इतर.