ग्रामपंचायतींची तब्बल १०० कोटींची करवसुली
By admin | Published: November 12, 2016 07:09 AM2016-11-12T07:09:35+5:302016-11-12T07:09:35+5:30
जिल्ह्यातील १४०७ ग्रामपंचायतींमध्ये कर भरण्यासाठी शुक्रवारी ग्रामस्थांनी रांगा लावल्या होत्या. हवेली तालुक्यातील काही मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये दिवसभरात प्रत्येकी ६० ते ७० लाखांचा कर जमा झाला आहे.
पुणे : जिल्ह्यातील १४०७ ग्रामपंचायतींमध्ये कर भरण्यासाठी शुक्रवारी ग्रामस्थांनी रांगा लावल्या होत्या. हवेली तालुक्यातील काही मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये दिवसभरात प्रत्येकी ६० ते ७० लाखांचा कर जमा झाला आहे.
शासनाने जुन्या नोटांच्या आधारे कर भरण्यासाठी मुदतवाढ दिल्याने ही करवसुली शंभर कोटींच्या घरात जार्ईल, असा विश्वास ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शालिनी कडू यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.
थकीत कर भरून घेण्यासाठी खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. एकट्या हवेली तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये सुमारे ४७ कोटींचा कर वसूल होणे अपेक्षित असून, थकीत कराची रक्कम १२ कोटींच्या घरात आहे.
१३ नगरपालिकांमध्ये दिवसभरामध्ये ३ कोटी २० लाख रुपयांचा कर जमा झाला.
शहर आणि जिल्ह्यातील केबलचालकांकडे तब्बल १० ते १२ कोटी रुपयांची थकबाकी असून, दुपारी दोननंतर केवळ दोन तासांमध्ये सुमारे ६० लाखांची करवसुली झाली. वैयक्तिक कर भरण्यासाठी जुन्या नोटा चालू शकतात, असा आदेश प्राप्त झाल्यानंतर फोनाफोनी करून थकबाकीदारांना कर भरण्याचे आवाहन करण्यात आले.