भोर तालुक्यातील ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प
By admin | Published: November 18, 2016 05:51 AM2016-11-18T05:51:59+5:302016-11-18T05:51:59+5:30
विविध मागण्यांसाठी ग्रामसेवक युनियनच्या वतीने आंदोलन सुरू होते. मागण्यांची पूर्तता न झाल्याने आज १५५ ग्रामपंचायतींच्या
Next
भोर : विविध मागण्यांसाठी ग्रामसेवक युनियनच्या वतीने आंदोलन सुरू होते. मागण्यांची पूर्तता न झाल्याने आज १५५ ग्रामपंचायतींच्या किल्ल्या व शिक्के गटविकास अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्याने भोर तालुक्यातील ग्रामपंचायतीचे कामकाज पूर्णपणे ठप्प होणार आहे.
राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने प्रलंबित १५ मागण्यसिंाठी असहकार व काम बंद आंदोलन पुकारले होते. मात्र, शासनानकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आणि भोर तालुका ग्रामसेवक युनियनतर्फे तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या किल्ल्या व शिक्के गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्त केल्या.