Gram Panchayat Election: खेड तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींचे बिगुल वाजले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 07:33 PM2023-06-14T19:33:23+5:302023-06-14T19:34:19+5:30

या आठवडाभरात ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडती काढण्यासाठी बोलावण्यात येणाऱ्या ग्रामसंभाच्या तारीख, वेळ प्रशासन जाहीर करणार आहे...

Grampanchayat Election Trumpets of 25 grampanchayats in Khed taluka pune news | Gram Panchayat Election: खेड तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींचे बिगुल वाजले

Gram Panchayat Election: खेड तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींचे बिगुल वाजले

googlenewsNext

राजगुरुनगर (पुणे) : खेड तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडती काढण्याबाबतचे निवडणूक आयोगाने निर्देश दिले असून १६ दरम्यान या सर्व ग्रामपंचायतींच्या विशेष ग्रामसभांचे आयोजन करून आरक्षण सोडती काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी दिली.

ऐन पावसाळ्यात ऑगस्ट दरम्यान ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजणार असून राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या आणि लोकनियुक्त सरपंच निवडीमुळे इच्छुक मंडळी सक्रिय झाली आहेत. आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने महसूल यत्रंणेने तयारीला सुरुवात केली असून १६ जून दरम्यान २५ ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय सोडती काढण्यासाठी महसूल यत्रंणेतील तलाठी, ग्रामसेवक यांना तशा सूचना जारी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तलाठ्यांच्या बदल्या झाल्या नसल्या तरी ग्रामसेवकांच्या बदल्या झाल्यामुळे त्यातच १५ जूनपासून शाळा सुरू होणार असल्याने शालेय प्रवेश, खरेदी त्यात निवडणुकीचे वारे सुरू झाल्याने एकच गोंधळ उडणार आहे. या आठवडाभरात ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडती काढण्यासाठी बोलावण्यात येणाऱ्या ग्रामसंभाच्या तारीख, वेळ प्रशासन जाहीर करणार आहे.

ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडती १६ जून दरम्यान काढण्यात आल्यानंतर गुरुवार दि. २२ जून रोजी प्रभागनिहाय आरक्षण प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या आरक्षण सोडतीवर हरकती व सूचना २३ ते ३० जूनपर्यंत दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या हरकती विचारात घेऊन यावर प्रांताधिकारी अभिप्राय ६ जुलै अखेर नोंदवल्यानंतर १४ जुलैला जिल्हाधिकारी अंतिम प्रभागनिहाय आरक्षण प्रसिद्ध करणार असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार मदन जोगदंड यांनी दिली.

या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडती होणार आहेत :-गोरेगाव सुपे कोहिणकरवाडी, वरुडे, सातकरस्थळ, पिंपळगाव तर्फे खेड, गाडकवाडी, होलेवाडी, निघोजे,सांडभोरवाडी, कोळीये, वहागाव, परसुल , देशमुखवाडी, मोरोशी, डेहणे, आडगाव, वाळद , वाघु, एकलहरे, तिफणवाडी, धुवोली, भोमाळे, संतोषनगर, वाकी बुद्रुक

Web Title: Grampanchayat Election Trumpets of 25 grampanchayats in Khed taluka pune news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.