दुचाकीच्या धडकेत आजोबा आणि नातवाचा मृत्यू; पुरंदर तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 20:04 IST2023-01-04T20:04:21+5:302023-01-04T20:04:35+5:30
अपघाताने दिवे परिसरात शोककळा पसरली असून महामार्गावरील व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली

दुचाकीच्या धडकेत आजोबा आणि नातवाचा मृत्यू; पुरंदर तालुक्यातील घटना
गराडे : पुरंदर तालुक्यातील दिवे येथे शेतकरी गोकुळ कोंडीबा झेंडे हे आपल्या नातवाला शाळेतून घरी घेऊन जात असताना हडपसरच्या बाजूने एक वेगवान दुचाकीने त्यांना धडक दिली. यात आजोबा व नातवाचा मृत्यू झाला. तर दुचाकीवरील तरूण गंभीर जखमी झाले आहेत.
गोकुळ झेंडे (वय 62) पद्मनाभ झेंडे (वय10) अशी त्या दोघांची नावे आहेत. हा अपघात शेतकरी गोकुळ झेंडे यांच्या राहत्या घरासमोरच झाला. या अपघाताने दिवे परिसरात शोककळा पसरली असून महामार्गावरील व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली होती. पुरंदर हवेली तालुक्यांना जोडणाऱ्या दिवे घाटा जवळ दिवे हे गाव आहे. हा पुणे - पंढरपूर पालखी महामार्ग आहे. या कामाला अनेक दिवसांनी मुहूर्त लागला आहे. या महामार्गावर अनेक निष्पाप लोकांचा जीव गेला असून कित्येकजण जखमी झाले आहेत.