केंदूर येथे जमिनीच्या वादातून नातवानेच केला आजोबांचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:09 AM2021-07-08T04:09:23+5:302021-07-08T04:09:23+5:30

शंकरराव कृष्णराव ताथवडे (वय ६९, रा. ताथवडेवस्ती, केंदूर, ता. शिरूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी भरत ...

Grandfather killed his grandson in a land dispute at Kendur | केंदूर येथे जमिनीच्या वादातून नातवानेच केला आजोबांचा खून

केंदूर येथे जमिनीच्या वादातून नातवानेच केला आजोबांचा खून

googlenewsNext

शंकरराव कृष्णराव ताथवडे (वय ६९, रा. ताथवडेवस्ती, केंदूर, ता. शिरूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी भरत ऊर्फ बबलू सुदाम चौधरी (वय ३६, रा. केंदूर, ता. शिरूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (दि. ६) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. शेताचा वाद झाला. त्यानंतर आरोपी चौधरीने आजोबांच्या घरी जाऊन शेताला काट्या लावता काय... मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही. आता तुला खल्लास करणार आहे, असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी करून आजोबांच्या डोक्यात, चेहऱ्यावर, मांडीवर दगडाने व लाकडी चौरंग, टेबल, फॅनने मारहाण केली. त्यामध्ये आजोबांचा मृत्यू झाला.

दरम्यान, निर्मला शंकर ताथवडे (वय ५५, रा. ताथवडेवस्ती, केंदूर, ता. शिरूर) हे भांडणे सोडवण्यास गेले होते मात्र त्यांनादेखील आरोपी चौधरीने शरीरावर मारहाण केली आहे. घटनास्थळी शिक्रापूर पोलिसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Grandfather killed his grandson in a land dispute at Kendur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.