खाकीतील माणुसकीमुळे आजोबांना सापडले कुटुंब

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 12:43 AM2018-08-12T00:43:51+5:302018-08-12T00:44:09+5:30

पोलीस म्हटले, की कठोरपणा... मात्र त्यांच्यात मायेचा ओलावाही असतो. बारामती तालुक्यातील एका घटनेतून माणुसकीचे दर्शन घडले. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या मदतीमुळे प्रवासात हरवलेल्या आजोबांना आपले कुटुंब सापडले.

grandfather meet hisFamilie due to Police | खाकीतील माणुसकीमुळे आजोबांना सापडले कुटुंब

खाकीतील माणुसकीमुळे आजोबांना सापडले कुटुंब

Next

- संतोष भोसले
वडगाव निंबाळकर : पोलीस म्हटले, की कठोरपणा... मात्र त्यांच्यात मायेचा ओलावाही असतो. बारामती तालुक्यातील एका घटनेतून माणुसकीचे दर्शन घडले. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या मदतीमुळे प्रवासात हरवलेल्या आजोबांना आपले कुटुंब सापडले.
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले सहायक फौजदार प्रल्हाद नारायण जगताप रविवारी (दि. ५) कामावरून घरी जात होते. सुपा- मोरगाव येथे एक थकलेले आजोबा रस्त्याच्या कडेला बसलेले आढळून आले. त्यांनी आजोबांची विचारपूस केली. थकलेल्या आवाजात आपण प्रवासात चुकल्याचे सांगितले. पण त्यांना नाव, गाव सांगता नव्हते. तब्येत बरी दिसत नसल्याचे जगताप यांना जाणवले. त्यांनी लागलीच १०८ रुग्णवाहिकेला बोलावून त्यातून सुपे येथील ग्रामीण रुग्णालयात त्या वृद्धाला दाखल केले. डॉक्टरांना विनंती करून त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यास सांगितले. त्यानंतर होमगार्ड महेंद्र शिवतारे यांना आजोबांची काळजी घेण्यास सांगितले. तीन दिवस शिवतारे यांनी त्यांची देखभाल केली. स्वत: घरून जेवणाचा डबा देत, औषधपाणी केले. भरपूर प्रयत्न करूनदेखील आजोबांकडून माहिती नीट मिळत नव्हती. मी हरवलो आहे आणि मला घरी जायचंय, एवढेच ते बोलत होते.
त्यांच्या कुटुंबियांचा शोध घेवून आजोबांची माती दिल्यानंतर कुटुंबीय दवागान्यात आले. त्यांना पाहून नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला. तेथे हजर असलेले होमगार्ड शिवतारे, रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांतदेखील अश्रू आले.
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार जगताप, होमगार्ड शिवतारे यांनी केलेल्या कृत्यातून खाकी वर्दीतील पोलिसांच्या ठायी असलेल्या माणुसकीचा प्रत्यय परिसरातील नागरिकांना आला. त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

जगताप व शिवतारे यांनी आजोबांकडे सापडलेल्या डायरीतून फोन नंबरवर संपर्क करून त्या आजोबांबद्दल व्यक्तीचे नातेवाईक शोधण्याचा प्रयत्न केला. पण फोन नंबर चुकीच्या ठिकाणी जात होते. त्यामुळे नातेवाईकांशी संपर्क होत नव्हता.
अखेर आजोबांची तब्येत ठीक झाल्यावर त्यांनी आपले नाव प्रभाकर शंकर देवळालीकर (रा. शिवाजीनगर, (सांगवी), पुणे) असल्याचे सांगितले.
नाव, पत्त्यावरून तपास करीत तेथील स्थानिक नगरसेवकांमार्फत नातेवाईकांशी संपर्क साधला. माहिती मिळताच बुधवारी (दि. ८) आजोबांचे नातेवाईक सुपे येथील रुग्णालयात आले. या आजोबांची आणि नातेवाईकांची भेट झाली.

Web Title: grandfather meet hisFamilie due to Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.