गटशिक्षणाधिकाऱ्याच्या निलंबनाचा ठराव मंजूर
By Admin | Published: April 30, 2017 04:55 AM2017-04-30T04:55:18+5:302017-04-30T04:55:18+5:30
वाघोली शाळा क्र. १ चे शिक्षक जीवन रामचंद्र वाघमारे (वय ३२) यांनी कर्जत तालुक्यातील गायकरवाडी शिवारात मंगळवारी (दि. २५) विष घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येला
पुणे : वाघोली शाळा क्र. १ चे शिक्षक जीवन रामचंद्र वाघमारे (वय ३२) यांनी कर्जत तालुक्यातील गायकरवाडी शिवारात मंगळवारी (दि. २५) विष घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येला जबाबदार धरत गटशिक्षणाधिकारी ज्योती परिहार यांच्या निलंबनाचा ठराव हवेली पंचायत समितीच्या सदस्यांच्या बैठकीत मंजूर केल्याची माहिती सभापती वैशाली महाडिक यांनी दिली.
जीवन वाघमारे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघोली नंबर १ येथे प्राथमिक शिक्षक म्हणून काम करीत होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी गटशिक्षणाधिकारी ज्योती परिहार यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती.
वाघोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपशिक्षक जीवन वाघमारे यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या ज्योती परिहार यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हवेली तालुका शिक्षक संघाने हवेली तालुक्याचे गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती.
हवेलीच्या गटशिक्षणाधिकारी ज्योती परिहार या तीन महिन्यांपूर्वी वाघोली परिसरातील एका खासगी शाळेच्या तपासणीसाठी गेल्या असता त्या शाळेचे पदाधिकारी व शिक्षकांनी परिहार व त्यांच्यासोबत असलेल्यांना शिवीगाळ व मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. वाघमारे यांच्यासह सहा शिक्षकांनी करावी, असे सांगण्यात आले होते. परंतु, हे सहा शिक्षक घटनास्थळी उपस्थित नव्हते म्हणून त्यांनी तक्रार करण्यास नकार दिल्याने त्यांना नोटीस देण्यात आली होती.
- ज्योती परिहार यांनाच या मृत्यूसाठी कारणीभूत ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. मात्र त्यांनी या प्रकरणी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.