कलावंतांना दरमहा अनुदान द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:15 AM2021-05-05T04:15:42+5:302021-05-05T04:15:42+5:30
महाराष्ट्रांत संगीत, नाट्य, सिने व सर्वच क्षेत्रांतील जवळपास लाखो कलाकार या गंभीर परिस्थितीतून जात आहेत. अशा वाईट लाॅकडाऊनमध्ये हातावर ...
महाराष्ट्रांत संगीत, नाट्य, सिने व सर्वच क्षेत्रांतील जवळपास लाखो कलाकार या गंभीर परिस्थितीतून जात आहेत. अशा वाईट लाॅकडाऊनमध्ये हातावर पोट भरणारे अनेक कलाकारही महाराष्ट्रभर आहेत. वास्तविक गेल्या वर्षापासूनच ही सर्व मंडळी बंदमुळे घरी बसून आहेत. त्याकाळात जवळ असेल नसेल ते सर्व खर्च करून कसेबसे आपला परिवार पोसत आहेत. आता मात्र आर्थिक स्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे सरकारने दरमहा कलावंतांना अनुदान देण्याची मागणी तिखे यांनी केली आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसावे लागेल, अशा इशाराही त्यांनी दिला आहे. या वेळी निवेदनात उपाध्यक्ष रफीक मनियार, सचिव दिलीप मोरे, खजिनदार सुरेश मिनेकर, विजयकुमार काळे, क्रांती शहा, रवि पिल्ले, गितांजली जेधे, रवींद्र कांबळे, राजेंद्र देसाई, शैलेश घावटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.