शिवजयंती निमित्त द्राक्ष महोत्सव - २०२१चे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:09 AM2021-01-18T04:09:48+5:302021-01-18T04:09:48+5:30
हा उपक्रम पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन, जुन्नर पर्यटन विकास संस्था जुन्नर, महाराष्ट्र शासन कृषी विभाग जुन्नर, कृषी विज्ञान केंद्र, ...
हा उपक्रम पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन, जुन्नर पर्यटन विकास संस्था जुन्नर, महाराष्ट्र शासन कृषी विभाग जुन्नर, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव आणि जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघ, जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर तालुक्यात दिनांक १९ ते २१ फेब्रुवारी, २०२१ या काळात करण्यात येणार आहे. इच्छुक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी नावनोंदणीसाठी श्रीराम गाढवे जितेंद्र बिडवई यांचेबरोबर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नावनोंदणी केलेल्या शेतकरी आणि आयोजकांची नियोजनासाठी बैठक आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई आणि अखिल भारतिय भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे यांनी दिली.
.
मजकुर-द्राक्ष महोत्सवासाठी
द्राक्षबाग ही रस्त्याच्या जवळ असावी,
द्राक्ष बागायतदाराने येणार्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष स्वागत तयारी करावी.
द्राक्षबागेच्या जवळील परिसर स्वच्छ ठेवून विविध द्राक्षे प्रकार, मनुके, ज्यूस, वाइन, बचत गटांची उत्पादने, चहापान आणि घरगुती जेवण अशी व्यवस्था शेतकऱ्यांनी करणे अपेक्षित आहे. द्राक्षशेतीविषयक माहिती देणारी चित्रफीत किंवा गाइडची सोय असावी, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.