कान्हूर मेसाई येथील विद्यार्थ्यांचा एक घास चिऊला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:10 AM2021-03-20T04:10:26+5:302021-03-20T04:10:26+5:30

या उपक्रमांअतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक शाळेसमोर चिमण्यांरिता अन्नपाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. एकीकडे शाळांमध्ये बालकांना सकस आहार ...

A grass chiula of students from Kanhur Mesai. | कान्हूर मेसाई येथील विद्यार्थ्यांचा एक घास चिऊला.

कान्हूर मेसाई येथील विद्यार्थ्यांचा एक घास चिऊला.

Next

या उपक्रमांअतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक शाळेसमोर चिमण्यांरिता अन्नपाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. एकीकडे शाळांमध्ये बालकांना सकस आहार देऊन त्यांना शिक्षणही दिले जाते तर दुसरीकडे शाळेत समोरच पक्षांचाही विचार करून त्यांनाही अन्न पाणी मिळावे म्हणून व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे इमारतीमध्ये विद्यार्थ्यांचा तर बाहेर चिमण्यांचा आवाज घुमत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

-

या नाविन्यपूर्ण उपक्रम कान्हूरमेसाई (ता. शिरूर) विद्यालयाचे प्राचार्य अनिल शिंदे व विद्यार्थ्यांच्या कल्पनेतून ग्रामीण भागातील शाळांमध्ये राबविला असून यात बालकासह चिमणी यांनाही आधार मिळत असून पर्यावरणाचे संरक्षण होत आहे. चिमण्यांच्या किलबिलाटात बालकेही आनंदात राहतात असे निसर्गरम्य वातावरण पालकांना मिळावे याकरिता विद्यालयाचे प्राचार्य अनिल शिंदे पर्यवेक्षक साहेबराव आंधळे व विद्यार्थ्यांनी एक घास चिउला हा उपक्रम सुरू केला आहे. हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु करण्यात आहे.

--

पूर्वी मोठ्या संख्येने अंगणात आढळणाऱ्या चिमण्या मध्यंतरी नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे चिमण्यांचे प्रमाण वाढणार आहे विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने आता शाळे समोर दाना पाण्याची व्यवस्था होत असल्याने पक्ष्यांना आधार मिळणार आहे.

-भास्करराव पुंडे, माजी अध्यक्ष विद्याधाम प्रशाला कान्हूरमेसाई.

--

कोट २

एक घास चिऊचा हा उपक्रम राबविला जात असून विद्याधाम शाळेसमोर असणाऱ्या बागेच्या झाडांवर पक्षांसाठी पिण्याचे पाणी व अन्न दररोज उपलब्ध करून दिले जात आहे हा एक चांगला उपक्रम असून पक्षांना आधार मिळत आहे.

- अनिल शिंदे, प्राचार्य विद्याधाम हायस्कूल

--

पोफोटो क्रमांक - १९ कान्हूरमेसाई

फोटो : शिरूर येथील विद्यालयात समोरील असणाऱ्या बागे मधील झाडावर विद्यार्थ्यांनी बनविलेल्या चिऊसाठी घरटे लटकत असंताना दिसत आहे

Web Title: A grass chiula of students from Kanhur Mesai.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.