डॉक्टरांना कृतज्ञता सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:08 AM2021-07-03T04:08:48+5:302021-07-03T04:08:48+5:30
पुणे : कोरोनाकाळात डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. दीड वर्षांपासून आरोग्य कर्मचारी आणि वैद्यकीय क्षेत्रातील ...
पुणे : कोरोनाकाळात डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. दीड वर्षांपासून आरोग्य कर्मचारी आणि वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी जिवावर उदार होऊन काम केले आहे. हे सर्व काम अतुलनीय असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.
''डॉक्टर्स डे''चे औचित्य साधून पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात मोहोळ यांच्या वतीने डॉक्टरांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला. या वेळी क्रीडा समितीचे अध्यक्ष अजय खेडेकर, आरोग्य विभाग प्रमुख डॉ. आशिष भारती आणि नायडूतील कर्मचारी उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, ''अनेकांनी आपले आप्तस्वकीय या महामारीत गमावले. परंतु डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमुळे पुणे शहर कोरोनाच्या पहिल्या दुसऱ्या लाटेचा सक्षमपणे सामना करू शकले. सामाजिक कृतज्ञतेच्या भावनेने आत्मविश्वास आणि आपुलकीने वैद्यकीय यंत्रणा काम करत होती. रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यापासून डॉक्टर्सपर्यंत सर्वांचेच योगदान अतिशय महत्त्वाचे होते, असे महापौर म्हणाले.