सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पोलीस दलाचे शानदार संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 06:41 PM2017-10-31T18:41:37+5:302017-10-31T18:44:16+5:30
शहर पोलीस दलाच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते़. पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून बी़ जे़ मेडिकल कॉलेजच्या मैदानावरून रॅलीची सुरुवात करण्यात आली़.
पुणे : शहर पोलीस दलाच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते़ या रॅलीची सुरुवात सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून बी़ जे़ मेडिकल कॉलेजच्या मैदानावरून करण्यात आली़
रॅली नेहरू मेमोरियल चौक, लाल मंदिर, समर्थ पोलीस स्टेशन, रास्ता पेठ, लक्ष्मी रोड, खंडूजीबाबा चौक, गुडलक चौक, फर्ग्युसन रोडने रॅली शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात आली़ येथे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सर्वांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली़ या वेळी सहआयुक्त रवींद्र कदम, अपर पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे, रवींद्र सेनगावकर, साहेबराव पाटील, प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त बसवराज तेली, प्रवीण मुंडे, गणेश शिंदे, दीपक साकोरे, पंकज डहाणे, सुधीर हिरेमठ, संजय बाविस्कर, ज्योतिप्रिया सिंह, अशोक मोराळे आदी उपस्थित होते़
या रॅलीत प्लाटून कमांडर यांच्यासह २० पोलीस उपनिरीक्षक, पुणे शहर पोलीस पुरुष व महिला प्लाटून, वाहतूक शाखा, पुणे ग्रामीण, पुणे रेल्वे, होमगार्डचे प्लाटून, वाहतूक शाखेकडील हेल्मेटधारी मोटारसायकलचे प्लाटून व बीटमार्शल प्लाटून सहभागी झाले होते़