येणेरेत शेतीशाळेला मोठा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:09 AM2020-12-25T04:09:30+5:302020-12-25T04:09:30+5:30
यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी क्रुषि विज्ञान केंद्र नारायणगाव चे शास्त्रज्ञ योगेश यादव म्रुदा तज्ञ व राहूल घाडगे तज्ञ क्रुषि ...
यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी क्रुषि विज्ञान केंद्र नारायणगाव चे शास्त्रज्ञ योगेश यादव म्रुदा तज्ञ व राहूल घाडगे तज्ञ क्रुषि विस्तार दत्ता जाधव मंडळ आधिकारी जुन्नर आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक सुर्यकांत विरणक व सीएमआरसी गोरडे ,काळे व ढोले आणी सर्व महिला शेतकरी उपस्थित होते.
यावेळी योगेश यादव यांनी माती परीक्षणाचे महत्व त्यातील घटक या विषयी माहिती दिली. तसेच माती परीक्षणानुसार खताची मात्रा कशी द्यावी व योग्य खत व्यवस्थापनाचे फायदे या विषयी महिलांना मार्गदर्शन केले. जमीनीतील सेंद्रीय कर्ब वाढवायला कोणकोणत्या बाबी आवलंबण्यात याव्या या विषयी मार्गदर्शन केले. राहुल घाडगे यांनी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला कसा घ्यावा तसेच मातीचा पोत सुधारणा साठी काय काळजी घ्यावी. कोणकोणत्या गोष्टींचा वार करावा मंडळ कृषी अधिकारी यांनी कृषी विभागाचे रोजगार हमी योजना मधील गांडूळखत, नँडेफ,कंपोस्ट खतासाठी च्या योजनांची माहिती दिली. आत्माचे श्री विरणक यांनी प्रस्ताविक केले व श्रीमती गोरडे यांनी आभारप्रदर्शन केले.
--
फोटो : २४ राजुरी
फोटो : येणेरे (ता.जुन्नर) या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषी अधिकारी