पीएमपीच्या ई बस धावण्यास उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:09 AM2021-06-05T04:09:03+5:302021-06-05T04:09:03+5:30

पीएमपीने बस उत्पादन कंपनीस लवकर बस देण्याचे दिले आदेश लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पीएमपीच्या नव्या ई बसची ...

Great for running PMP's e-bus | पीएमपीच्या ई बस धावण्यास उत्तम

पीएमपीच्या ई बस धावण्यास उत्तम

Next

पीएमपीने बस उत्पादन कंपनीस लवकर बस देण्याचे दिले आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पीएमपीच्या नव्या ई बसची चाचणी अहवाल सीआयआरटीला दिला असून, यात ई बस धावण्यास उत्तम असल्याचे नमुद आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने हैद्राबाद बस उत्पादन करणाऱ्या कंपनीस बसच्या उत्पादनास सुरुवात करा, तसेच लवकरात लवकर पहिल्या टप्प्यातील ७५ बस पाठवून द्या, असे सांगितले आहे.

१७ मे रोजी नव्या इ बसची चाचणी पूर्ण झाली. यावेळी सलग सात दिवस रोज १२ तास गाडीत साडे तीन टन वजनाचे वाळूचे पोते ठेवून शहराच्या वेगवेगळ्या मार्गावर ही बस फिरविण्यात आली. यावेळी गाडीचा वेग, वातानुकूलित यंत्रणा, चेसीची सुरक्षितता, वळणावरची गाडीची स्थिती आदी बाबी तपासण्यात आल्या.

सीआयआरटी व पीएमपीच्या पथकाच्या उपस्थित वेगवेगळ्या स्तरावर चाचणी घेण्यात आली होती. त्याचा अहवाल नुकताच पीएमपीला प्राप्त झाला आहे. चाचणी पूर्ण झाल्याने नव्या ५०० बसचा मार्गातील मोठी अडचण दूर झाली आहे.

-----------------------

एकूण ५००, पहिल्या टप्यात ७५ बस मिळणार

पुणेकरांचा शहरांतर्गत प्रवास अधिक सुसह्य व्हावा या करिता पीएमपी ५०० नव्या इ बस घेत आहे. यातील ३५० बस पुणे महापालिका उपलब्ध करून देणार आहे, तर उर्वरित १५० बस ह्या केंद्र शासनाच्या फेम २ या योजनेतील आहेत. हैद्राबाद येथील इलेक्ट्रा नावाची कंपनी ह्या बसचे उत्पादन करणार आहे. पहिल्या टप्यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात यातील ७५ बस पीएमपी ला मिळतील. ही बस १२ मीटर लांब असून एका बसची किंमत १ कोटी ९५ लाख इतकी आहे.

-------------------------

नव्या ई बसची चाचणी सात दिवस चालली. सीआयआरटी ने या संदर्भात आपला अहवाल दिला असून तो सकारात्मक आहे. त्यामुळे आम्ही बस उत्पादनास संबंधित कंपनीस सांगितले आहे. लवकरात लवकर बस मिळावे म्हणून यासाठी प्रयत्नशील आहोत.

डॉ. चेतना केरुरे, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

------------

Web Title: Great for running PMP's e-bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.