'आरएसएस' संघटनेत प्रचंड एकोपा अन् ही देशातील सर्वात मोठी संघटना - सुषमा अंधारे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 08:23 PM2023-02-15T20:23:48+5:302023-02-15T20:24:06+5:30

भारतभर फिरा, देशात, राज्यात, कोणत्याही जिल्ह्यात, गावात कुठेही आरएसएसचा बॅनर तुम्हाला दिसणार नाही तरीही त्यांच्यात एकोपा असतो

Great unity in 'RSS' organization and it is the largest organization in the country - Sushma Andhare | 'आरएसएस' संघटनेत प्रचंड एकोपा अन् ही देशातील सर्वात मोठी संघटना - सुषमा अंधारे

'आरएसएस' संघटनेत प्रचंड एकोपा अन् ही देशातील सर्वात मोठी संघटना - सुषमा अंधारे

googlenewsNext

बारामती : आरएसएस चे लोक व्हॉट्सअपवर न बोलता प्रत्यक्षात भेटतात.हि देशातील सर्वात मोठी संघटना असुन देखील या संघटनेचे रजिस्ट्रेशन नाही. सगळा तोंडी व्यवहार आहे. पण ते लोक एकमेकांशी जोडले गेले आहेत, या संघटनेत प्रचंड एकोपा असल्याचे शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले.

बारामती येथे आयोजित  हिंदु कोल्हाटी समाजाच्या मेळाव्याला अंधारे उपस्थित होत्या. या मेळाव्याला राज्यभरातून कोल्हाटी समाजातील बांधव उपस्थित होते. यावेळी आरएसएस संघटनेच्या कार्यपध्दतीबाबत अंधारे म्हणाल्या, या देशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हीअसून ती ब्राम्हणांची संघटना आहे. आरएसएसचा व्यक्ति दुसऱ्या व्यक्तिला भेटायला जाताना  तो पत्नी, मुलाला सोबत घेऊन जातो. तेथे तो त्याच्या मित्राशी गप्पा मारताना त्याची पत्नी मित्राच्या पत्नीशी तर मुलगा मित्राच्या मुलाशी बोलतो, त्यातून त्यांचे ‘बाँडींग’ तयार होते. समाजात असे ‘बाँडींग’ तयार होणे गरजेचे  आहे. तुम्ही भारतभर फिरा, देशात, राज्यात, कोणत्याही जिल्ह्यात, गावात कुठेही आरएसएसवर अमक्याची तालुकाध्यक्षपदी निवड झाली असा बॅनर तुम्हाला दिसणार नाही. तरीही त्यांच्यात एकोपा असतो. ते एकमेकांना बांधले गेलेले असतात. ते एकमेकांना सतत भेटतात. संडे इज द मिशन डे म्हणून भेटतात,मात्र, आपल्याकडे असे होत नाही,असे अंधारे यांनी नमुद केले.

आपण स्त्रीप्रधान व्यवस्था, स्त्रीप्रधान संस्कृती असल्याचे  म्हणतो, पण आपल्याला नवब्राम्हण्यवादाचा रोग जडला आहे. त्यामुळे आमच्या बाईचे नखसुद्धा दिसत नसल्याच्या फुशारक्या आपण मारतो. आपली महिला समाजात मिसळलीच नाही तर तिचे ‘प्रॉब्लेम’कसे समजणार, असा सवाल त्यांनी केला. ज्यांचा झेंडा एक असतो त्यांचा अजेंडा एक असतो. ज्यांचा झेंडाच नसेल त्यांचा अजेंडा कसा तयार होईल, हा एक साधा प्रश्न आहे. अर्थात तो झेंडा काय असावा, कसा असावा हे कोणी एकाने ठरविण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र येवून ठरविणे केव्हाही चांगले. पण होते काय लोकशाहीमध्ये जेव्हा सगळी माणसं एकत्र येतात तेव्हा लोकशाहीचे जसे फायदे आहेत तसे कधी कधी नुकसानही होते. कारभारी सतरा आणि वेड्याची जत्रा अशी स्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे अंधारे म्हणाल्या.

Web Title: Great unity in 'RSS' organization and it is the largest organization in the country - Sushma Andhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.