वंचित समाजासाठी लोकनेते मारुतराव जाधव यांचे मोठे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:08 AM2021-06-20T04:08:29+5:302021-06-20T04:08:29+5:30
बारामती : वंचित समाजासाठी लोकनेते मारुतराव जाधव यांनी बारामतीत मोठे काम केले आहे. त्या सामाजिक कामाचा वारसा राणी जाधव ...
बारामती : वंचित समाजासाठी लोकनेते मारुतराव जाधव यांनी बारामतीत मोठे काम केले आहे. त्या सामाजिक कामाचा वारसा राणी जाधव चांगल्या प्रकारे चालवीत असल्याचे मत सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी मत व्यक्त केले.
येथील लोकनेते मारुतराव जाधव प्रतिष्ठान यांच्यावतीने लोकनेते मारुतराव जाधव यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व कोरोना बारामतीतील योद्ध्ये यांचा सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. येथील येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचालित लेट माणिकबाई चंदूलाल सराफ ब्लड बँक बारामती येथे शिबिर झाले. सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, गटनेते सचिन सातव, अॅड. अशोक इंगुले, अॅड. नयनतारा काळे आदी उपस्थित होते.
बारामतीचे कोरोना योद्ध्ये राजेश लोहाट, गणेश दोडके, राजू पवार, पंकज पवार, नितीन शिंदे, विनोद क्षीरसागर यांचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी ब्लड बँकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. के. सिसोदिया उपस्थितीत होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रतिष्ठानच्या प्रमुख राणी जाधव, लोकेश जाधव, सूरज जाधव, चैतन्य गायकवाड, प्रल्हाद जाधव, विकास जाधव आदींनी परिश्रम घेतले.
————————————————
फोटो ओळी : लोकनेते मारुतराव जाधव यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरात रक्तदान करताना रक्तदाते आणि इतर.
१९०६२०२१-बारामती-०४
————————————————