ग्रीन कॉरिडॉरमुळे तिघांना जीवदान : पुण्यातील तरुणाचे यकृत प्रत्यारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 09:38 PM2018-07-25T21:38:34+5:302018-07-25T21:48:38+5:30

सोलापूर येथील एका ५३ वर्षीय रूग्णाला डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीनंतर खाजगी रूग्णालयात मेंदूमृत घोषित करण्यात आले. या रूग्णाचे यकृत व मुत्रपिंड दान केल्याने तीन व्यक्तींना जीवदान मिळाले आहे.

Green corridor gives life to three person : liver transplant of youth in Pune | ग्रीन कॉरिडॉरमुळे तिघांना जीवदान : पुण्यातील तरुणाचे यकृत प्रत्यारोपण

ग्रीन कॉरिडॉरमुळे तिघांना जीवदान : पुण्यातील तरुणाचे यकृत प्रत्यारोपण

googlenewsNext
ठळक मुद्देसोलापूरहून दोन तास ५० मिनिटांत प्रवास अवयवाच्या प्रत्यारोपणाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढणे ही एक प्रोत्साहन देणारी बाब

पुणे : लिव्हर सिरॉसिसने ग्रस्त असलेल्या पुण्यातील ३८ वर्षीय रूग्णावर मंगळवारी यशस्वीरित्या यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. सोलापूर येथील एका ५३ वर्षीय रूग्णाला डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीनंतर खाजगी रूग्णालयात मेंदूमृत घोषित करण्यात आले. या रूग्णाचे यकृत व मुत्रपिंड दान केल्याने तीन व्यक्तींना जीवदान मिळाले आहे. मुत्रपिंड अन्य रूग्णालयास देण्यात आले,तर यकृत सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रस्ता येथे आणण्यात आले.
डॉ.दिनेश झिरपे म्हणाले, ‘सोलापूर येथील ५३ वर्षीय व मेंदूमृत घोषित केलेल्या रूग्णाविषयी आम्हाला माहिती मिळाली. त्यानंतर ताबडतोब आमची टीम सोलापूरला पोहोचली व त्यांनी हे यकृत पुण्यात आणले. सर्वसामान्यपणे सोलापूर ते पुणे प्रवासासाठी ५ तास लागतात. मात्र, ग्रीन कॉरिडॉर निर्माण करून हे यकृत २ तास ५० मिनिटे इतक्या कमी वेळात पुण्यात आणण्यात आले.’
डॉ. बिपीन विभुते म्हणाले, ‘आमची टीम दुपारी १२ वाजता निघाली व पुण्यात २ वाजून ५० मिनिटांनी पोहोचली. त्यानंतर, पुण्यातील रूग्णावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. या रूग्ण शेवटच्या टप्प्यातील लिव्हर सिरॉसिसने ग्रस्त होता.’
डॉ.बिपीन विभूते, डॉ दिनेश झिरपे, डॉ. अनिरुद्ध भोसले, भलतज्ञ डॉ मनीष पाठक,डॉ मनोज राऊत, क्लीनिशिअन डॉ अभिजीत माने, प्रत्यारोपण समन्वयक राहुल तांबे व अरुण अशोकन, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता नितीन दुषिंग यांनी या प्रत्यारोपणामध्ये महत्वाची भूमिका बजावली.
डॉ.केतन आपटे म्हणाले, ‘अवयवाच्या प्रत्यारोपणाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढणे ही एक प्रोत्साहन देणारी बाब आहे. परंतु, अवयवाची गरज असणारे रुग्ण आणि अवयदाते यांच्या संख्येत अजूनही प्रचंड तफावत आहे. ही दरी भरून काढायची असेल तर अवयवदान किमान २० पटीने वाढणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प करणे आवश्यक आहे.’

Web Title: Green corridor gives life to three person : liver transplant of youth in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.