वृक्षारोपणाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘ग्रीन ऑलिम्पियाड’ - शालेय विद्यार्थ्यांसाठी उपक्रम; ऑनलाइन उद्घाटन करून प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:15 AM2021-08-18T04:15:16+5:302021-08-18T04:15:16+5:30
वृक्षारोपणास प्रोत्साहन देण्यासाठी ३ गटांत ही ऑलिम्पियाड स्पर्धा होणार आहे. त्यात ५ ते ९ वृक्षांची रोपे लावणाऱ्यांचा गट, १० ...
वृक्षारोपणास प्रोत्साहन देण्यासाठी ३ गटांत ही ऑलिम्पियाड स्पर्धा होणार आहे. त्यात ५ ते ९ वृक्षांची रोपे लावणाऱ्यांचा गट, १० ते १२ वृक्षांची रोपे लावणाऱ्यांचा गट आणि बारापेक्षा अधिक वृक्षांची रोपे लावणाऱ्यांचा गट असणार आहे. प्रत्येक गटातील पहिल्या ५०० विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीसाठी निवडले जाणार आहे. प्रत्येक गटात पहिल्या पाच क्रमांकाचे विद्यार्थ्यांना लॅपटॉप, मोबाईल फोन, टॅब अशी पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. सर्व गटात मिळून पहिल्या १०० विद्यार्थ्यांना हार्ड डिस्क ड्राइव्ह आणि इतर पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. राधा फडणीस यांनी सूत्रसंचालन केले. कृष्णा पाटील यांनी प्रश्नमंजूषा स्पर्धेची माहिती दिली.
डॉ. विनिता आपटे म्हणाल्या ,‘पर्यावरणाबाबत जनजागृती करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. शालेय वयापासून पर्यावरणाबद्दल प्रेम निर्माण व्हावे, यासाठी हा उपक्रम आहे.’
पोलीस उपायुक्त मितेश घट्टे म्हणाले, ‘पर्यावरण जपण्याचा विचार केवळ एक दिवस करून चालणार नाही. पर्यावरणाचे महत्व सर्वांना पटवून देता आले पाहिजे. निसर्ग मोठा की चंगळवाद मोठा, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.’