डोणज्यात बहरली सिपनाची हिरवीगार वनराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 01:32 AM2019-01-09T01:32:15+5:302019-01-09T01:32:23+5:30

मानव निर्मित जंगल जपण्याचा टेलस संस्थेचा उपक्रम : २३ एकर जागेत कष्टाने जोपासली हिरवाई

Greenhorn forest in pune | डोणज्यात बहरली सिपनाची हिरवीगार वनराई

डोणज्यात बहरली सिपनाची हिरवीगार वनराई

Next

सहकारनगर : सिपना (मानवनिर्मित जंगल) प्रमोद नारगोलकर व नैना नारगोलकर या निसर्गप्रेमी दाम्पत्याने १९९२ मध्ये पुण्यात डोणजे येथे २३ एकर जागेत प्रचंड मेहनत व कष्टाने अत्यंत सुंदर असे मानव निर्मित जंगल तयार केले आहे. आज येथे काही दुर्मिळ वृक्ष व असंख्य पक्षी नांदत आहे. दरम्यान, २००४ मध्ये प्रमोदसरांचा अंदमान येथील सुनामीत दुर्दैवी मृत्यू झाला. या नंतर त्याचे स्वप्न नैना नारगोलकरांनी पूर्ण केले.

सिपना मानव निर्मित जंगलास भेटी देण्याकरिता अनेक पर्यावरण प्रेमी मंडळी, अभ्यासक व शालेय विद्यार्थ्यांच्या सहली येथे येतात. परंतु ुएकट्याने सांभाळत असलेल्यांना नयना नारगोलकर आजही लोकांकडून काही ना काही त्रास चालूच असतो. या जिवापाड सांभाळ केलेल्या जंगलाचा काही भागात सुरक्षा (कंपाउंड ) नसल्याने आज लोकांनी तेथील सुमारे १० ते ११ एकर जंगल पूर्ण तोडले, आगी लावल्या व नुकसान केले.

टेलस आॅर्गनायझेशन संस्थेच्या लोकेश बापट यांनी गेल्या आठवड्यात जाऊन नैनाताई नारगोलकर यांची भेट घेत जंगलाची पाहणी करून अडचणी समजावून घेतल्या व लगेचच स्वत: पुढाकार घेऊन या भागात बार्बेड ( तार व सिमेंट पोल)
याचे कंपाऊंड टाकण्यास स्वखर्चाने सुरवात केली असून अजूनही पुढे खूप मोठे लक्ष्य साधायचे आहे काम सोपं नसले तरी झाडे,झुडपे,
पक्षी, प्राणी वाचवणे अत्यन्त गरजेचे आहे याच करता हा खटाटोप व छोटा प्रयत्न टेलस आॅर्गनायझेशन संस्थे कडून चालू आहे. अजूनही अनेक भागात येथे सुरक्षा कुंपण घालणे गरजेचे असून या करता समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी या करता मदतीचा हात दयावा.
 

Web Title: Greenhorn forest in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे