ग्रीटिंग कार्ड्सच्या राहिल्या केवळ आठवणी, मागणी केवळ पाच टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 01:47 AM2017-10-18T01:47:52+5:302017-10-18T01:48:12+5:30
पूर्वी दिवाळी म्हटल्याबरोबर फराळ, फटाके, नवीन कपडे या साºया गोष्टींबरोबरच आकर्षक रंगसंगतीतीले लहान-मोठ्या आकाराचे, अर्थपूर्ण मजकूर असणारे ग्रीटिंग कार्ड डोळ्यासमोर येते.
कोरेगाव मूळ : पूर्वी दिवाळी म्हटल्याबरोबर फराळ, फटाके, नवीन कपडे या साºया गोष्टींबरोबरच आकर्षक रंगसंगतीतीले लहान-मोठ्या आकाराचे, अर्थपूर्ण मजकूर असणारे ग्रीटिंग कार्ड डोळ्यासमोर येते. आपल्या जिवलगांनी, आप्तस्वकीयांनी पोस्टाद्वारे, कुरिअरद्वारे, स्वत: भेटून दिलेले ग्रीटिंग काडर््स वर्षानुवर्षे सांभाळून ठेवली जात.
वारंवार ते काढून पाहिले जायचे, आठवणींना उजाळा दिला जायचा. सोशल मीडियाच्या जगात आता हे ग्रीटिंग कार्ड हद्दपार झाले असून, एकेकाळी ८०-९० टक्के असणारी ग्रीटिंग कार्डची मागणी केवळ पाच टक्क्यांवर आली आहे. ग्रीटिंग कार्ड देणाºयांनीच प्रमाण कमी केल्यामुळे आता ग्रीटिंग कार्ड बनविणारे, संदेश लिहिणारे (कॉपीरायटर), ग्रीटिंग कार्ड विकणारे या साºया साखळीवरच त्याचा परिणाम झाला असून, आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. ग्रीटिंग कार्डची विक्री करणा-या व्यावसायिकांना आता गिफ्ट आयटम्स ठेवून इतर पर्यांयाचा विचार करावा लागत आहे.
पूर्वीच्या काळी दिवाळीच्या खर्चात ग्रीटिंग कार्ड्स खरेदी, पोस्टिंगचा खर्च याचे सेपरेट बजेट बाजूला काढून ठेवावे लागायचे. दिवाळीच्या एक-दोन दिवस आधी ग्रीटिंग कार्ड समोरच्याला मिळेल, असे नियोजन करून तिकीट लावून, व्यवस्थित पत्ता टाकून ग्रीटिंग पाठविले जायचे. मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना तर ग्रीटिंग कार्ड दिले जायचेच पण व्यावसायिक हितसंबंध दृढ करण्यासाठी विविध कार्यालये, कंपन्या, बॅँका, लहान-मोठ्या संस्था यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात ग्रीटिंग कार्डची देवाणघेवाण केली जायची.
सोशल मीडियाचा विस्तार होण्याआधी व मोबाईल जगतात क्रांती झाल्यानंतर दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी लोक स्वस्तातल्या बल्क एसएमएसला प्राधान्य देत होते. आता हे एसएमएसही मागे पडत चालले असून व्हॉट्सअॅप, फेसबुक आदी सोशल मीडियाने त्याची जागा घेतली आहे. एकेकाळी आपले वर्चस्व टिकवून ठेवणाºया ग्रीटिंग काडर््सना आता घरघर लागली आहे.
विविध सामाजिक संस्था, बचतगट हेदेखील मोठ्या प्रमाणात ग्रीटिंग कार्ड बनवून विकत असायचे. त्या संस्थांना आर्थिक मदत करायची या पवित्र हेतूने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ग्रीटिंग कार्ड खरेदी केले जायचे. ग्रीटिंग कार्डमध्ये कल्पकता, पर्यावरणपूरक साहित्याचा वापर आदी विविध गोष्टींचा विचार केलेला असायचा. मात्र आता सोशल मीडियाद्वारे दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचे काम सुलभ, स्वस्त, बरेचदा तर विनामूल्य, जलद झाले असल्याने अबालवृद्धांनी पारंपरिक ग्रीटिंग कार्ड्सना बाय बाय करीत व्हॉट्सअॅप, एसएमएस, ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक, मेसेंजर यांना आपलेसे केले आहे.