वाडा येथील शाळा-महाविद्यालयात अण्णांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:12 AM2021-09-23T04:12:00+5:302021-09-23T04:12:00+5:30
सरपंच रघुनाथ लांडगे, खेड पंचायत समितीचे माजी सभापती काळुराम सुपे, स्कूल कमिटी सदस्य संभाजी वाडेकर, कुमुदिनीताई केदारी, ज्ञानदेव सुरकुले, ...
सरपंच रघुनाथ लांडगे, खेड पंचायत समितीचे माजी सभापती काळुराम सुपे, स्कूल कमिटी सदस्य संभाजी वाडेकर, कुमुदिनीताई केदारी, ज्ञानदेव सुरकुले, श्रीपती कहाणे, प्राचार्य शिवाजीराव दुंडे, पर्यवेक्षक सतिष हाके, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मनोहर जाधव यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
कर्मवीर जयंतीनिमित्त विद्यालयात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात क्रिकेट, निबंध, वक्तृत्व, लिंबू चमचा, संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी दहावी व बारावी मधे यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच रत्नप्रभा शितोळे व आशिष कांबळे या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
इयत्ता १० वी तील अल्ताफ इनामदार या विद्यार्थ्याला आदर्श विद्यार्थी पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भोसरी रोटरी क्लबचे अध्यक्ष उद्योजक रामदास जैद होते. यावेळी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मनोहर जाधव, शोभा जाधव, अभिनेते दत्ता उबाळे, विजय उबाळे, राजेंद्र काजळे, प्रसिध्द गायक सावनकुमार सुपे, विदयाताई ढोबळे, सरलाताई बोरकर, हेमाताई शेटे, रामचंद्र साबळे, तेजपाल शहा, शशिकांत पावडे, दिलीप बच्चे, राजकुमार भालेराव, राजू हुंडारे उपस्थित होते.
माजी विद्यार्थी संघाकडून ज्या विद्यार्थ्यांना १० वी व १२ वीत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळतील अश्या विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले. सूत्रसंचालन आशिष कांबळे व इम्रान मुलाणी यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य शिवाजीराव दुंडे यांनी केले तर उमेश कोळी यांनी आभार मानले.