स्वच्छतेचे काम करत बाबासाहेबांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:10 AM2021-04-19T04:10:13+5:302021-04-19T04:10:13+5:30
लष्कर : अरोरा टॉवर चौकातील उभा असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची स्वच्छता करून स्वच्छता कामगार आणि अग्निशमन दल विभागाकडून ...
लष्कर : अरोरा टॉवर चौकातील उभा असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची स्वच्छता करून स्वच्छता कामगार आणि अग्निशमन दल विभागाकडून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
आरोग्य अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरसेवक यांच्याकडे नेहमीच तक्रार करण्यात येते. १४ एप्रिलला साजरी झालेल्या जयंतीनंतर नियमित स्वच्छता करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियमित कामाद्वारे बाबासाहेबांना अभिवादन करत असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.
बाबासाहेबांच्या पुतळ्याची स्थापना दिवंगत प्रकाश केदारी यांनी केली होती. पुढे त्याचा विकास उपाध्यक्ष रोहिदास गायकवाड यांनी केला. पुतळ्याचे धूळ, अस्वछतेपासून संरक्षण व्हावे यासाठी पुतळ्याभोवती मेघडंबरीकरणाचे काम २०१० च्या दरम्यान करण्यात आले. राष्ट्रीय सण, जयंतीला पुतळ्याची स्वच्छता, साफसफाईचे काम बोर्डाच्या माध्यमातून केले जाते.
मुकादम महेश जेधे म्हणाले की, जयंतीनंतर पुतळ्याची स्वछता करत महामानवाला मानवंदना दिली. या वेळी अविनाश कांबळे, महादेव थोरात, अश्विन गोहिरे, तिरुपती स्वामी आदींनी स्वच्छता केली.
फोटो -