बाजीप्रभूंना अभिवादन
By admin | Published: July 17, 2017 04:26 AM2017-07-17T04:26:18+5:302017-07-17T04:26:18+5:30
श्रीमंत सरदार स. ह. गुप्ते चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ट्रस्टतर्फे वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : श्रीमंत सरदार स. ह. गुप्ते चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ट्रस्टतर्फे वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, आमदार माधुरी मिसाळ, नगरसेविका मानसी देशपांडे, अखिल भारतीय सीकेपी मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष सुधाकर वैद्य आदी उपस्थित होते.
याप्रसंगी उल्हास पवार, सतिंद्रनाथ फडकर, अरुण देशपांडे आणि प्रमोदिनी चिटणीस यांना सामाजिक कार्याबद्दल ‘वीररत्न बाजीप्रभू देशपांडे जीवनगौरव’ पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी बाजीप्रभूंच्या पन्हाळा येथील पूर्णाकृती पुतळ्याची प्रतिकृती भेट देण्यात आली.
या वेळी मोहन शेटे यांनी शब्दप्रभू राम गणेश गडकरी यांच्या साहित्यावर प्रकाश टाकला. अॅड. रवी यादव यांनी बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू यांच्या समाधीकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. अशोक देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. नंदकुमार वाढावकर आणि पुष्पा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.