मंचर ग्रामपंचायतीमध्ये बाणखेले यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:09 AM2021-06-04T04:09:45+5:302021-06-04T04:09:45+5:30
या वेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या अरुणाताई थोरात,पंचायत समितीचे सदस्य राजाराम बाणखेले,सरपंच किरणताई राजगुरु,उपसरपंच युवराज बाणखेले,ग्रामविकास अधिकारी के.डी.भोजणे यांच्यासह ग्रामपंचायतीचे ...
या वेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या अरुणाताई थोरात,पंचायत समितीचे सदस्य राजाराम बाणखेले,सरपंच किरणताई राजगुरु,उपसरपंच युवराज बाणखेले,ग्रामविकास अधिकारी के.डी.भोजणे यांच्यासह ग्रामपंचायतीचे आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना स्वर्गीय किसनरावजी बाणखेले यांचे नातू आणि विद्यमान उपसरपंच युवराज बाणखेले म्हणाले की, स्व. किसनराव बाणखेले यांच्या पुतळ्याचे पूर्ण झालेल्या स्मारक उद्घाटनाची वेळ ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पुढाकाराने ठरवली जाणार आहे. पंचायत समितीचे सदस्य राजाराम बाणखेले म्हणाले की, सर्वसामान्य आणि गोरगरिबांचा नेता अशी स्व. किसनराव बाणखेले यांची ओळख होती. सर्वसामान्य जनतेचे अश्रू पुसण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. स्वत:चा संसार आणि नातेवाईक यांच्याकडे दुर्लक्ष करून जनसेवक म्हणून समाजामध्ये प्रतिमा तयार केली. बाणखेले यांचे स्मारक मंचर ग्रामपंचायतीसमोर साकारण्यात आले असून लवकरच उद्घाटन केले जाणार आहे.
--
फोटो क्रमांक :०३ मंचर बाणखेले जयंती
छायाचित्र मजकुर:मंचर येथे स्व.किसनराव बाणखेले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील व मान्यवर.