घोडेगाव येथे बिरसा मुंडा यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:09 AM2021-06-11T04:09:11+5:302021-06-11T04:09:11+5:30
यावेळी आदिम संस्थेचे सचिव डॉ. अमोल वाघमारे, किसान सभेचे राजू घोडे, एसएफआयचे अविनाश गवारी व या सोबतच महाविद्यालयील शिक्षण ...
यावेळी आदिम संस्थेचे सचिव डॉ. अमोल वाघमारे, किसान सभेचे राजू घोडे, एसएफआयचे अविनाश गवारी व या सोबतच महाविद्यालयील शिक्षण घेणारे विद्यार्थी स्नेहल साबळे, आशा लोहकरे, नेहा बांबळे, संचिता खेबडे, अनुजा असवले, अभिषेक घोडेकर इत्यादी उपस्थित होते. बिरसा मुंडा यांनी जल, जंगल आणि जमिनी वाचवण्यासाठी उभारलेला लढा आजही संपलेला नाही. आज मोठ्या प्रमाणात निसर्गाची हानी होत आहे. शोषित, कष्टकरी जनतेला न्याय मिळत नाही. त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आज या प्रसंगी शोषित, कष्टकरी जनतेच्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करण, निसर्ग संपत्तीचे संरक्षण करणे हेच खरे बिरसा मुंडा यांना अभिवादन असेल असे यावेळी राजू घोडे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व प्रस्ताविक अनिल सुपे आणि समीर गारे यांनी केले.
10062021-ॅँङ्म-ि02 - घोडेगाव येथे बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिनानिमित्त जमलेले विविध संस्थांचे पदाधिकारी.