विविध उपक्रमांनी महामानवाला अभिवादन

By admin | Published: December 6, 2014 10:51 PM2014-12-06T22:51:59+5:302014-12-06T22:51:59+5:30

मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतीगृह ट्रस्टच्या भिमाई आश्रमशाळा, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले माध्यमिक विद्यालयात आदरांजली वाहण्यात आली.

Greetings to the greatman by various activities | विविध उपक्रमांनी महामानवाला अभिवादन

विविध उपक्रमांनी महामानवाला अभिवादन

Next
इंदापूर : भारतर} डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतीगृह ट्रस्टच्या भिमाई आश्रमशाळा, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले माध्यमिक विद्यालयात आदरांजली वाहण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष र}ाकर मखरे, मुख्याध्यापिका अनिता मखरे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर व तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. बुद्धवंदना घेण्यात आली. मुख्याध्यापक साहेबराव पवार, नानासाहेब सानप, सतीश कोल्हे, बाळासाहेब गायकवाड, उमेश ढावरे, समीर मखरे, माऊली नाचण, गोरख तिकोटे, दादासाहेब जगताप, रवींद्र रोकडे, अनिल ओहोळ, लता सातपुते, सविता गोफणो व विद्यार्थी वर्ग या वेळी उपस्थित होता.
इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने नगरपरिषदेच्या प्रांगणातील डॉ. आंबेडकरांच्या अर्धपुतळ्याचे पूजन नगराध्यक्ष अशोक इजगुडे यांच्या हस्ते करण्यात आले. विलास मखरे यांनी बुद्ध वंदना घेतली. नगरपरिषदेच्या कार्यालयात डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पुजन झाले.
शाहु फुले आंबेडकर बहूद्देशीय विकास प्रतिष्ठान संचलित श्रीदेवी वरसुबाई मुलांच्या वसतीगृहात पत्रकार सुरेश मिसाळ यांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष संदिपान कडवळे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली.
 
4डॉ. बाबासाहेब अांबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. जेतवन बुद्धविहारात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन रिपाईंचे तालुकाध्यक्ष शिवाजी मखरे यांच्या हस्ते करण्यात आले. भन्ते हर्षवर्धन यांनी त्रिशरण पंचशीलाची प्रतिज्ञा दिली. संघटनेचे संजय कांबळे, मोहन जाधव, वाहतूक नियंत्रक नियंत्रक कुचेकर,  नितीन आरडे, अमोल मिसाळ, गुणा सरवदे, बंटी सोनवणो, सतीश सागर, शिवाजी तानाजी मखरे, दत्ता कोळेकर उपस्थित होते.
 
बारामतीत विविध संघटनातर्फे आदरांजली 
बारामती : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 58 व्या  महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवारी (दि.क्6)    बारामती शहर व परिसरातील सर्व समाजबांधवांनी अभिवादन  केले.  
इंदापूर रस्त्यावरील पुतळ्यास आज पुष्पहार घालण्यात आले. बारामतीचे आमदार अजित पवार, नगराध्यक्ष सुभाष सेामाणी, उपनगराध्यक्ष रेश्मा शिंदे, प्रातांधिकारी संतोष जाधव, तहसीलदार निलप्रसाद चव्हाण, मुख्याधिकारी दीपक ङिांझाड, नगरसेविका सविता लोंढे, आरती शेंडगे, ज्योती बल्लाळ, माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण, माजी नगरसेवक अभिजित सेानावणो, नवनाथ बल्लाळ, शिवाजीराव शेलार, सुधिर सेानावणो आदींनी अभिवादन केले. उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे, गं्रथपाल प्रा. अलका जगताप, प्रा. निलीमा पेंढारकर, प्रबंधक विजय रसाळ, डॉ. आंनदा गांगुर्डे, प्रा. पंढरीनाथ सांळुखे, प्रा. मंगेश कोळपकर उपस्थित होते. बारामती वकिल संघटनेच्या वतीने  अॅड. विजय मोरे तसेच अध्यक्ष अॅड. राजेंद्र काळे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. या वेळी अॅड. अरविंद गायकवाड, अॅड. विजय जावळे, अॅड. तुषार ओहोळ, अॅड. नितीन भामे, अॅड. चंद्रशेखर जगताप यांची भाषणो झाली.
 
4शनिवारी सकाळी 9 वाजता प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात गं्रथालय विभागाच्या वतीने सलग 18 तास अखंड गं्रथवाचन या उपक्रमाचे आयेाजन करण्यात आले. सकाळी 6 ते रात्री 12 वाजेर्पयत गं्रथांलयाच्या वाचनकक्षात विद्याथ्र्यानी सहभाग नोंदविला. या वेळी डॉ. साधना देशपांडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून याचे उद्घाटन केले. ‘नॅक’नेही या उपक्र माचे वाचन संस्कृती रूजविणारा उपक्रम म्हणून गौरव केला आहे.

 

Web Title: Greetings to the greatman by various activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.