महामानवास अनुयायांचे अभिवादन
By admin | Published: December 7, 2014 12:53 AM2014-12-07T00:53:13+5:302014-12-07T00:53:13+5:30
जगण्याचे सामथ्र्य देणा:या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरीनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायांनी शनिवारी विनम्र अभिवादन केले.
Next
पिंपरी : जगण्याचे सामथ्र्य देणा:या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरीनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायांनी शनिवारी विनम्र अभिवादन केले. सहकुटूंब दाखल झालेल्या या अनुयायांचा जनसागर पिंपरी येथील डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात जनसागर लोटला. यानिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण करणारे विविध उपक्रम सामाजिक संघटनांनी राबविल्याचे दिसून आले.
सकाळीच महापालिका प्रशासन व विविध संघटनांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळा व परिसराची साफसफाई केली. दरवर्षीप्रमाणो या वेळीही सायंकाळपासूनच अभिवादन करण्यास पुतळा प्रांगणात येण्यास अनुयायांची सुरूवात झाली. रात्री उशीरार्पयत गर्दीचा ओघ वाढतच राहिला. येणारा प्रत्येकजण डबडबलेल्या डोळ्यांनी व जड अंत:करणाने मेणबत्त्या, अगरबत्ती पेटवून अभिवादन करीत होता. तसेच पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अनेकांनी भावांजली अर्पण केली. अनुयायांसाठीचे डॉ. आंबेडकरांचे विचार, त्यांचा जीवनपट उलगडणा:या छायाचित्रंसह असलेले फलक पुतळा प्रांगणातील खांबांवर लावल्याचे दिसले. उद्यानात आंबेडकरी साहित्याचे सामुहिक वाचन करण्याच्या उपक्रमात हजारो जणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
रस्त्यांलगत आंबेडकरी साहित्य विक्रीच्या दुकानांवर खरेदीसठी गर्दी झाली.(प्रतिनिधी)