समर्थ शैक्षणिक संकुलात कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:09 AM2021-09-25T04:09:37+5:302021-09-25T04:09:37+5:30
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष माउली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, प्राचार्य डॉ. अनिल पाटील, प्राचार्य डॉ. लक्ष्मण घोलप, ...
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष माउली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, प्राचार्य डॉ. अनिल पाटील, प्राचार्य डॉ. लक्ष्मण घोलप, प्राचार्य राजीव सावंत, प्राचार्य डॉ. संतोष घुले, डॉ. सुभाष कुंभार, प्राचार्य अनिल कपिले, प्राचार्य सतीश कुऱ्हे, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. लक्ष्मण घोलप म्हणाले की, स्वावलंबी शिक्षण हे ब्रीद समजून बहुजनांच्या शिक्षणाचा वटवृक्ष उभा करणारे कर्मवीर हे समाजसुधारक आणि शिक्षण प्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षण प्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली. मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व शिका’ ही योजना सुरू करून मोठे काम केले.
रयत शिक्षण संस्थेच्या रूपाने शिक्षणाची गंगा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महानकार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. ज्ञानार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा आणि स्वातंत्र्याची मूल्ये रुजवण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले आहे. शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे, वंचित आणि सर्वच घटकातील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे, निरनिराळ्या जातिधर्मांतील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे यासाठी त्यांनी प्रयत्न केला. नैतिक मूल्ये जोपासून समतेचा संदेश देणारे शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील हे एक कर्मयोगी असल्याचे संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके म्हणाले. आभार प्रदीप गाडेकर यांनी मानले.