महात्मा गांधी विद्यालयात कर्मवीरांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:13 AM2021-09-23T04:13:48+5:302021-09-23T04:13:48+5:30
या वेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, उद्योजक उदय बेंडे पाटील, ...
या वेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, उद्योजक उदय बेंडे पाटील, माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले, स्कूल कमिटी सदस्य संजय बाणखेले, बाळासाहेब पिंगळे, संतोष बाणखेले, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष आशिष पुंगलिया, अण्णासाहेब आवटे कॉलेजचे प्राचार्य के. जी कानडे, विद्यालयाचे माजी उपमुख्याध्यापक माधव कानडे, सुभाष मोरडे, प्राचार्य उत्तम आवारी, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका शेतसनदी, पर्यवेक्षक साहेबराव काळे, यादव चासकर, ज्युनिअर कॉलेज विभागप्रमुख लक्ष्मण रोडे यांच्या हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. हे कर्मवीर भाऊराव पाटलांनी जाणले होते. बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करताना विद्यार्थ्यांमध्ये बंधुता, समता रुजावी यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षणातून समता व बंधुता यांचे संस्कार विद्यार्थ्यांना दिले. बहुजन समाजाच्या कल्याणासाठी कर्मवीरांनी ज्ञानाची गंगा खेडोपाडी पोहोचविली. कर्मवीरांनी उभारलेल्या रयत शिक्षण संस्थेत लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, असे विचार प्राचार्य उत्तम आवारी यांनी व्यक्त केले. कलाशिक्षक दिलीप चौधरी, संदीप कोल्हे, धीरज कोळेकर, अश्रफ पठाण, मूर्तुजा मोमीन, विश्वास गायकवाड, संतोष गाडेकर, किसन गुडदे, दत्तात्रय चासकर, निवृत्ती बांगर, बाळकृष्ण केदारी, संतोष मुंढे, सचिन आढळराव, सत्यवान तोत्रे, संजय बाणखेले, एकनाथ चव्हाण, विजय शेळकंदे, नितीन शिरोळे, विशाल पोंगडे, दत्तात्रय खोरे, विशाल गाडे, प्रलय गावंड, माधुरी गिते, सुवर्णा गोसावी, प्राची चौधरी, मनीषा थोरवे, उज्ज्वला बाणखेले, अनिता चव्हाण, दुर्गा चौधरी, उज्ज्वला हुले, वैशाली सुरकुले, नंदा केंगले, मयुरी क्षीरसागर, सुनीता जाधव, प्रतिभा दीक्षित, प्रियांका गवळी, आरती शेलार यांनी नियोजन केले. केशव टेमकर यांनी सूत्रसंचालन केले, तर किशोर जगताप यांनी आभार मानले.